श्री. शांता विद्यालयामध्ये शारदोत्सव उत्साहात

.

श्री. शांता विद्यालयामध्ये शारदोत्सव उत्साहात

सरस्वती देवी म्हणजे साक्षात ज्ञानाचा महासागर जिच्या कृपाशीर्वादाने ज्ञान, बुद्धी ,शक्ती ,सिद्धी,व सर्व कला गुण आपण प्राप्त करू शकतो. अशा या ज्ञानाचा विश्वगुरू असलेल्या सरस्वती देवीचे पूजन विद्याभारती संचालित सड्ये शिवोली येथील श्री शांता विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक श्री .मुकुंद कवठणकर उपस्थित होते तसेच शाळेचे व्यवस्थापक श्री.शिवाजी पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .प्रजिता सांगाळे, शिक्षक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी गण या कार्यक्रमाला हजर होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे यांनी मान्यवरांचे ओळख तसेच शब्द सुमनांनी त्यांचे स्वागत केले.
प्रमुख पाहुणे श्री. मुकुंद कवठणकर यांनी सरस्वती देवीचा महिमा कीर्तना द्वारे उत्तम रित्या वर्णिला.
तद्नंतर शिक्षिका सौ. कीर्ती पार्सेकर व शिक्षक श्री संगम चोडणकर , श्री सुरेश केरकर यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला. शिक्षिका सौ. विषया आमणेकर गावस यांनी सरस्वतीदेवी बद्दल विशेष माहिती सांगितली.
सरस्वती पूजा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मधील सरस्वती चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थी कुमार बाबू शेळके याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर कुमार सानवीक केरकर यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले व कुमार अमित कुमार याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले
कडधान्या पासून रांगोळी तयार करणे या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी कुमारी दिशा गावडे हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर आफ्रिन खान हिला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले व कुमारी उज्वला शेळके हिला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
त्याचप्रमाणे सरस्वती वंदना पठण या स्पर्धेमध्ये कुमार विद्यार्थिनी कुमारी उज्वला शेळके हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर विद्यार्थिनी कुमारी निकिता कुमारी पंडित हिला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
तसेच पुष्पहार तयार करणे या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनी कुमारी खुशी सिद्दिकी हिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर विद्यार्थिनी कुमारी साधना बेन हिला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले .कुमारी नसीमा सिद्दिकी हिला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
त्याचप्रमाणे शाळेमध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमातील स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी बक्षिसे प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शिक्षक श्री.उमेश महालकर व शिक्षिका कुमारी आरती गावस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
नैवैद्य व प्रसादाची व्यवस्था पालक श्री . परमेश्वर पुजारी यांनी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री .नवनाथ सावंत यांनी केले. तसेच आभार प्रकटन शिक्षक श्री.विश्वास सांगळे यांनी केले . कार्यक्रमाची सांगता आरतीने करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar