_*गोव्यात सनातन संस्थेचे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’*_

.

_*सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक ०९/१०/२०२१

_*गोव्यात सनातन संस्थेचे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’*

*सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा लाभ घेऊन नागरिक चांगले भवितव्य घडवू शकतात ! ग्लेन टिकलो, भाजपचे आमदार, हळदोणा मतदारसंघ*

म्हापसा, ९ ऑक्टोबर – सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा लाभ घेऊन नागरिक चांगले भवितव्य घडवू शकतात. या ग्रंथांचा पंचायत आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमांतून अधिकाधिक प्रसार होणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपचे हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी केले. सनातनने अध्यात्मशास्त्र, सात्त्विक धर्माचरण, नित्य आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवरील अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथांमधील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी संस्थेच्या वतीने गोव्यासह भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सनातनच्या साधकांनी आमदार ग्लेन टिकलो यांची भेट घेऊन त्यांना ग्रंथसंपदेविषयी सविस्तर माहिती दिली. ही माहिती ऐकल्यानंतर आमदार ग्लेन टिकलो यांनी हे आवाहन केले.
आमदार ग्लेन टिकलो पुढे म्हणाले, ‘‘सनातनने ‘नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार’, भावी पिढीला सुसंस्कारित बनवणारे ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’, ‘दोष घालवा अन् गुण जोपासा’ आदी उपयुक्त ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मुलांवर चांगले संस्कार करणे ही आज काळाची गरज आहे. मुले भ्रमणभाष, माहितीजाल (इंटरनेट) आदींमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे ते चांगल्या शिकवणीपासून दूर रहातात. सनातनचे हे ग्रंथ वाचल्यास मुलांना त्यांचा लाभ होऊ शकेल. हे ग्रंथ पुष्कळ कष्ट घेऊन सिद्ध करण्यात आले आहेत. हे ग्रंथ सर्व वाचनालयांमध्ये ठेवता येतील. पंचायत स्तरावर ग्रंथांविषयी जागृती मोहीम राबवता येईल. प्रत्येक नागरिकाने स्वत: थोडा वेळ काढून या ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, तसेच ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’तही सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे ग्रंथ उपयुक्त आहेत. जीवन आज वेगाने पुढे जात असल्याने नैतिक मूल्यांचा नागरिकांना विसर पडत चालला आहे.मी स्वत:च्या ज्ञानात भर घालण्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी सनातनचे ग्रंथ खरेदी करणार आहे.’’

आपला विश्‍वासू,
श्री. तुळशीदास गांजेकर,
सनातन संस्थेकरिता (संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar