- गोवा मराठी अकादमी संचलित मराठी सांस्कृतिक केंद्र खोलपेवाडी- साळ, यांच्या वतीने केळेश्वर मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यात सरकारी प्राथमिक विद्यालय देऊळवाडा वडावल या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात दुसरे बक्षीस ग्रीष्म गौरीश गावस तर तिसरे बक्षीस प्रतीक प्रशांत नारुलकर यांना प्राप्त झाले. मुलांना शिक्षक श्री वसंत परवार, श्री लक्ष्मण मिशाल व सौ वैशाली राऊत यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले. तसेच पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या तर्फे या दोन्ही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
सरकारी प्राथमिक विधालय वडावल शाळेचे यश
.
[ays_slider id=1]