विध्यार्थ्यांचा गौरव सोहळा

.
शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर पुढील आयुष्यात कधीच अपयश येत नाही, आणी यश मिळवण्यासाठी नेटाने काम करणे गरजेचे आहे. एकदा का शिक्षणाचा पाया मजबूत झाला की मग आकाशात भरारी मारण्याची ताकद येते. आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर आपण ज्या शाळेतून शिक्षण घेतले त्या शाळेलाही विसरता कामा नये असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनी मुलांना मार्गदर्शन करताना केले.
       पर्रा पंचायत क्षेत्रातील 2020-2021 या वर्षात 10 वी व 12 वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा पर्रा पंचायतीच्या वतीने मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पर्रा पंचायतीच्या सरपंच डिलायला लोबो, इतर सर्व पंचसदस्य उपस्थित होते.
         यावेळी पुढे बोलताना मंत्री लोबो यांनी सांगितले की पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक निश्चित ध्येय ठेवण्याची गरज आहे.नुसते नोकरदार न बनता यशस्वी उद्योजक बनून इतरांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध कराव्यात किंवा मोठ्या पदावर जाण्याचा प्रयत्न करावा असे मंत्री लोबो यांनी सांगितले. सरपंच डिलायला लोबो यांनी सुरवातीला सर्वांचे स्वागत करून विध्यार्थ्यांच्या सत्कारामागचा हेतू स्पष्ट केला.
      फोटो…….. पर्रा पंचायतीतर्फे आयोजित गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार करताना  घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, सोबत पर्रा च्या सरपंच डिलायला लोबो व इतर…….( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar