वागातोर किनाऱ्यावर पर्यटकांच्या बॅगा चोरताना हणजूण पोलिसांनी दोघा चोरट्यांना हणजूण पोलिसांनी रंगेहात पकडले.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र येथील रवी राकेश राजपूत हा पर्यटक दि.20 रोजी सकाळी दहाच्या सुमारास वागातोर किनाऱ्यावर समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना किनाऱ्यावर त्यांनी ठेवलेली त्यांची बॅग चोरताना हणजूण किनाऱ्यावर तैनात असलेल्या पोलिसांनी प्रेम सिस्माल यादव (28) मूळ. छतीसगड, रायपूर व नानू दयाराम यादव (41) मूळ गाजीपूर, उत्तर प्रदेश दोघेही सध्या रा. चार रस्ता, आसगाव या दोघा चोरट्यांना रंगेहात पकडले. या बॅगेत रोख रु.410/- व रिअल मी 7 मोबाईल फोन होता असे रवी राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले असून हणजूण पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर दोन्ही चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करून पोलीस कोठडी घेतली, पुढील तपास हवालदार योगेश कोरगावकर हे निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
वागातोर किनाऱ्यावर गेल्या काही दिवसापासून पर्यटकांच्या गाडीतील सामान व किनाऱ्यावरील सामान चोरण्याचा घटना घडल्यामुळे हणजूण पोलिसांना किनाऱ्यावर तैनात केले होते.