वागातोरचा समुद्र किनारा पर्यटन खात्याकडून पर्यायाने सरकारकडून दुर्लक्षित

.
वागातोर समुद्र किनाऱ्याचे भाग्य केव्हा उजळेल ?  हा मोठा प्रश्न सद्या स्थानिकांना व पर्यटकांना पडलेला आहे. कारण गेली अनेक वर्षे या समुद्र किनाऱ्यावर भेट देणारे पर्यटक साधन सुविधा पुरवण्यास गोवा सरकार व सरकारचे पर्यटन खाते दुर्लक्ष करीत आहेत का असा प्रश्न विचारताना आढळतात. पर्यटन खात्याच्या दुर्लक्षतेमुळे अनेक समस्या मात्र वाढत आहेत.
        नितांत सुंदर असा वाळूचा पट्टा लाभलेला उत्तर गोव्यातील वागातोरचा समुद्र किनारा पर्यटन खात्याकडून पर्यायाने सरकारकडून दुर्लक्षित झालेला आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी मूलभूत साधनसुविधा तर नाहीच अनेक समस्या मात्र भेडसावत आहेत. सर्वात मोठी समस्या म्हणजे टॉयलेट्स व चेंजिंग रूम. या किनाऱ्यावर टॉयलेट आहे तो समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर च्या अंतरावर तोही डोंगर माथ्यावर,  हा टॉयलेट म्हणजे सुलभ शौचालय सकाळी आठ वाजता उघडले जाते आणि सायंकाळी सात वाजता बंद केले जाते,पर्यटन हंगामात या ठिकाणी रांगा लागतात, तसेच या ठिकाणी चेंजिग रूमही नाही, त्यामुळे समुद्र स्नानाचा आनंद उपभोगणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होते. या समुद्र किनाऱ्यावर पहाटेच्या वेळी काहीजण प्रिव्हेडिंग किंवा आफ्टर वेडिंग फोटो शूट करण्यासाठी येतात तसेच एखाद्या चित्रपटाचे किंवा जाहिरातीचे चित्रीकरण करण्याकरिता महिला तसेच कामगार वर्ग मोठया प्रमाणात येतात. जवळपास टॉयलेट नसल्याने महिलांची कुचम्बना होते. चित्रीकरणासाठी असलेला कामगार वर्ग पहाटेच्या वेळी किनाऱ्यावरील झाडाझुडुपांचा व वाळूच्या टेकड्यांचा आडोसा घेऊन आपले विधी आटोपतात त्यामुळे किनाऱ्यावर दुर्गन्धी पसरते.
         येथील हेलिपॅडवर अर्थात वाहनतळावर काही वर्षांपूर्वी पर्यटन खात्याने पर्यटकांना व स्थानिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बाक बसवले होते. ते मोडून अनेक वर्षे झाली तरी पर्यटन खात्याने त्या जागेवर दुसरे बाक अद्याप बसवलेले नाहीत, दोन वर्षांपूर्वी स्थानिक आमदार विनोद पालयेकर यांनी काही लाकडी बाक बसवले होते पण तेही काही अज्ञातांनी उखडून तोडून टाकले. साडेचार वर्षा पूर्वी अनेक वर्षे बंद असलेला हायमास्ट दिवा बदलून नवीन दिवे बसवले होते, गेल्या दोन वर्षांपासून तेही हायमास्ट दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते, या काळोखाचा फायदा घेत पर्यटक बिनदिक्कत पणे किनाऱ्यावर मध्यपान करतात आणि दारूच्या व बियरच्या बाटल्या तसेच इतर कचरा किनाऱ्यावरच सोडून जातात ज्याचा त्रास दुसऱ्या दिवशी पहाटे चालण्याचा व्यायाम करणाऱ्या स्थानिकांना व पर्यटकांना होतो. येथील हायमास्ट दिवा दुरुस्त करावा म्हणून पर्यटन खात्याकडे आपण तक्रारही केली पण पर्यटन खात्याने दुर्लक्ष केले अशी प्रतिक्रिया आमदार पालयेकर यांनी दिली.
          या समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या पायवाटेच्या प्रवेश द्वारावर येथील हॉटेल व इतर व्यवसायिकांकडून कचरा व बाटल्या टाकल्या जातात, या कचऱ्याची दुर्गन्धी येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना येते तर भटकी जनावरे व कुत्री या कचऱ्यावर ताव मारून कचरा पायवाटेवर आणून टाकतात.या समुद्र किनाऱ्याकडे जाणारी पायवाट मुळातच अरुंद असून येथे पर्यटक बोटिंचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाने पायावटेवरच बोटी आणून ठेवल्याने तसेच अज्ञातांकडून किनाऱ्यावर दगडी कुंपण घातल्याने ही पायवाट आणखी अरुंद झाली आहे, या प्रकराकडे पर्यटन खात्याने व किनारा विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने लक्ष देऊन कारवाई करावी अशी पर्यटकांची व स्थानिकांची मागणी आहे. याच वाटेवर कचरा पेट्या ठेवण्यात आल्याने पर्यटकांना नाक बंद करून व भटकी कुत्री व जनावरांना सांभाळत किनाऱ्यावर जावे लागते.
        दीड किलोमीटर लांबीचा सुंदर समुद्र किनारा असूनही या किनाऱ्याकडे पर्यटन खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे पर्यटकाबरोबरच स्थानिकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या किनाऱ्यावर पर्यटकांना बेवारस गुरांचा त्रास तर होतोच त्याच बरोबर या ठिकाणी असलेल्या 15 ते 20 भटक्या कुत्र्यांचा त्रासही मोठया प्रमाणात होतो, तसेच लमाणी व फिरत्या विक्रेत्यांचा उपद्रवही पर्यटकांना सहन करावा लागतो. पर्यटन खात्याने कचरा टाकण्यासाठी या ठिकाणी कचरापेट्या मोठया प्रमाणात उपलब्ध केल्या पण सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला तरी या कचरा पेट्या किनाऱ्याच्या बाहेर विसावा घेत आहेत, यामुळे पर्यटकांनी टाकलेला व समुद्रातून आलेला कचरा दुसऱ्या दिवशी किनारा सफाई कामगार येई पर्यत तसाच पडलेला असतो, या किनाऱ्यावरील समस्यांची सोडवणूक करून पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावेसे वाटेल अन्यथा पुन्हा वागातोर किनाऱ्यावर येण्याचे टाळले जाईल असे मुंबई येथील पर्यटक अरुण मोंडकर यांनी सांगितले.
        फोटो ओळी…..1) वागातोर समुद्र किनाऱ्याच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या कचराकुंडीतील कचऱ्यावर ताव मारताना भटकी कुत्री  2) किनाऱ्याबाहेर विसावा घेत असलेल्या कचरापेट्या 3) किनाऱ्याच्या प्रवेशद्वारा जवळ अज्ञातांकडून बांधण्यात आलेले दगडी कुंपण………… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar