गोव्यात प्रथमच मायाजॅकी आंब्याच्या झाडांच्या लागवड

.
जगातील सर्वात महागडा आंबा ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत दिड लाख रुपये आहे अशा मुळ जपान येथील मायाजॅकि आंबाचे  कलम आता सडये  शिवोली येथील प्रयोगशील पर्यावरण प्रेमी डॉ. स्नेहल गोलतेकर यांनी आपल्या बागेत लावली आहेत.
खास कलकत्ता येथून आणलेल्या या मायाजॅकि आंबाची कलमे म्हापसा विभागीय कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर यांच्या हस्ते गोलतेकर यांच्या परसबागेत लावण्यात आली.
गोवा राज्यातील मानकुराद आंबा प्रसिद्ध आहे पण आता एका नव्या आंबाचे कलम डॉ. गोलतेकर यांनी प्रथमच सडये शिवोली येथे लावले आहे. यावेळी कृषी शिक्षिका रेशमा गोलतेकर. माजी मुख्याध्यापक कमलाकांत वायगणकर, प्रगतशील शेतकरी महेंद्र नाईक पेडणेकर , राजेश धारगळकर, चुडाजी मादेंकर, रुबेल हुसेन, डॉ स्नेहल गोलतेकर, आदि उपस्थित होते. हया आबांच्या कलमाला दोन वर्षात फळे येणार असून त्यासाठी दोन वर्षांची वाट पहावी लागणार आहे
 गोव्यात आता प्रथमच या कलमाची लागवड होणार आहे. पण हा एक ते दीड लाखाचा आंबा खायला अजून दोन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
 फोटो भारत बेतकेकर
मायाजॅकि आंबाची कलमे लावताना विभागणी कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर , रेशमा गोलतेकर, डॉ गोलतेकर, माजी मुख्याध्यापक कमलाकांत वायगणकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar