काणका-बांध, म्हापसा येथील श्रीकृष्ण पूजन उत्सवात आयोजित केलेल्या विविध स्पर्धां

.

काणका-बांध, म्हापसा येथील
श्रीकृष्ण पूजन उत्सवात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांती

 

ल विजेत्यांना श्री. दयानंद रायु मांद्रेकर यांच्या हस्ते
बक्षीस वितरण संपन्न.

काणका बांध येथील श्रीकृष्ण मंदिरात (मांगरात) आयोजित केलेल्या राधाकृष्ण वेषभूषा, पाककला (पोहयांचे पदार्थ) व मेहंदी स्पर्धेतील विजेत्यांना शिवोली मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री श्री. दयानंद रायु मांद्रेकर यांच्या हस्ते नुकतेच बक्षीस वितरण संपन्न झाले.
काणका बांध येथील श्रीकृष्ण मंदिरात (मांगरात) गेल्या पंच्याऐंशी वर्षांपासून नवरात्रोत्सवातील घटस्थापनेला
श्रीकृष्ण पूजन अगदी अविरतपणे केले जाते. हा उत्सव येथील गावकरी तेरा दिवस साजरा करतात. यंदाही हा उत्सव अगदी उत्साहात संपन्न झाला.

 

यावर्षी या उत्सवात मेहंदी, पाककला तसेच राधा-कृष्णाच्या वेषातील लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. भरगच्च उपस्थिती आणि स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद याच बरोबर स्पर्धांचा स्तर तोही वाखाणण्याजोगा होता. जागा अपुरी पडत असतानाही दाटीवाटीने गर्दी करून अमाप उत्साहात याठिकाणी श्री कृष्ण पूजन पार पडत असते .घुमटांच्या तालावर आरत्यानाही भरपूर गर्दी असते. मुंगी शिरायला जागा नसते म्हटलं तरी चालेल .बालगोपाळांचा तसेच महिलावर्गाचा ही सहभाग नजरेत भरण्यासारखा असतो. श्री महेश कोरगावकर, राजेश कोरगावकर,शैलेश कोरगांवकर व इतर मंडळी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शेवटच्या दिवशी दांडिया पण खेळला जातो .विविध स्पर्धांतील विजेते पुढील प्रमाणे आहेत.

मेहंदी स्पर्धेतील विजेते:-
प्रथम कु.ऋत्वा व कु.रिदध्वी कोरगावकर, द्वितीय कु.तृषा व कु.तृषा पेडणेकर ,तृतीय कु.स्मिरा व सौ.श्रद्धा कोरगावकर .

राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेतील विजेते :-
प्रथम कु.स्माही कोरगावकर (श्रीकृष्ण )द्वितीय कु. मयंक कोरगावकर( श्रीकृष्ण) अवनीश नार्वेकर (श्रीकृष्ण) चतुर्थ कु. रुद्रांश कोरगावकर (श्रीकृष्ण)
सहा उत्तेजनार्थ बक्षिसांचे विजेते पुढील प्रमाणे:-
प्रथम उत्तेजनार्थ श्रीराज कोरगावकर (कृष्ण )द्वितीय कु. नक्ष कोरगावकर (कृष्ण) तृतीय कु.विहान कोरगावकर (कृष्ण) चौथ्या स्थानी कु.सानवी कोरगावकर( राधा) पाचव्या कु.स्थानी स्मिरा कोरगावकर (राधा) आणि सहाव्या स्थानी कु.स्पृहा कोरगावकर( राधा)

पाककला स्पर्धा पोहे स्पेशल
होती. पोह्या पासून बनवलेले पदार्थ मागविण्यात आले होते. सदर स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभल्याकारणाने स्पर्धा दोन विभागात घेण्यात आली .गोड पोहे आणि तिखट पोहे अशी वर्गवारी करून प्रत्येक विभागात पाच विजेते ठरविण्यात आले .

गोड पोहे स्पर्धेतील
विजेते:- प्रथम सौ. हेमा निखार्गे, द्वितीय सौ.जैमिनी कोरगावकर ,तृतीय सौ. रिमा नाईक, चतुर्थ सौ. श्रद्धा कोरगावकर आणि पाचव्या बक्षिसाच्या मानकरी सौ. क्रांती कोरगावकर ठरल्या.
तिखट पोहे स्पर्धेतील विजेते प्रथम सौ.श्रद्धा शिरगावकर द्वितीय सौ.सुनीता कोरगावकर तृतीय सौ.सोनम कोरगावकर ,चतुर्थ सौ.सानवी मडगावकर व पाचव्या बक्षिसाच्या मानकरी सौ.सुनिता प्रदीप कोरगावकर ठरल्या. सदर स्पर्धेत पोहे लाडू ,रस पोहे ,पोहे मिल्कशेक, मस्क मेलन् पोहे ,चॉकलेट पोहे तसेच ड्रॅगन चॉप्स, फ्रेंच फ्राईस पोहे,ढोकला पोहे,पोहे पकोडा व पोहे चिवडा असे बक्षीसें प्राप्त झालेले पोहे होते.

स्पर्धांचे परीक्षण ब्युटी पार्लर चालविणाऱ्या मध्यंतरी नॅशनल मिसेस इंडियाच्या विजेत्या Bठरलेल्या ब्युटिशियन सौ. वृषाली सामंत ऊर्फ बिंदी या तसेच सौ.स्मिता जितेंद्र गवंडळकर व सौ. रेखा अवधूत पोकळे यांनी काम पाहिले .कार्यक्रमाचे सूत्र संचलन व स्पर्धा घेण्यामागील उद्देश श्री. महेश कोरगावकर यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन श्री.राजेश कोरगावकर यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar