सहा नायजेरियन नागरिकांना अटक

.

विदेश प्रवासाचा कोणताही दस्तऐवज उदा. पारपत्र, व्हिजा नसताना बेकायदेशीर पणे भारतात पर्यायाने गोव्यात वास्तव्य केल्या प्रकरणी हणजूण पोलिसांनी सहा नायजेरियन नागरिकांना अटक केली.
मिळालेल्या माहिती नुसार दि.23 रोजी सकाळी 8.45 च्या सुमारास शिवोली येथील एका खाजगी मैदानावर काही नायजेरियन फुटबॉल खेळत असल्याची खबर मिळाल्यानंतर हणजूण पोलिसांनी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले, त्यांची चौकशी केली असता कोणताही प्रवासाचा दाखला आढळला नसल्याने हणजूण पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध विदेशी कायदा 1946 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
1) डिओन रॉबर्ट अलबर्ट (31) इवोरी कॉस्ता नागरिक सध्या रा. पर्रा पेट्रोल पंपाजवळ, 2) उचे जॉय ओकाफोर (36) नायजेरियन नागरिक सध्या रा. ओशेल, शिवोली, 3) इबुका चिऊबा गोडवीन ओबाईकमे (37) नायजेरियन नागरिक सध्या रा. पर्रा, बार्देश, 4)ओंयीबर मीचले ओकऊडीली (23) नायजेरियन नागरिक सध्या रा. पर्रा, बार्देश, 5) जोसेफ नंदूले (39) नायजेरियन नागरिक रा. बेंगलोर, कर्नाटक,  सध्या रा. शिवोली, 6) इम्यान्यूअल अलुमा (32) नायजेरियन नागरिक रा दिल्ली सध्या रा. शिवोली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यातील डिओन रॉबर्ट अल्बर्ट याला हणजूण पोलिसांनी यापूर्वी 2021मध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केली होती व सध्या तो जामीनावर बाहेर होता. उचे जॉय ओकाफोर याला 2020 मध्ये हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केली होती. इबुका चिऊबा याला  2015 मध्ये हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली तसेच पासपोर्ट, व्हिजा नसताना गोव्यात बेकायदेशीर पणे वास्तव्य केल्या प्रकरणी विदेशी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली होती तर ओंयीबर मीचले याला 2019 रोजी गोवा गुन्हा शाखेने अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली व विदेशी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून अटक के�

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar