शिवोली मतदार संघातील सर्व रस्ते लवकरच फेर डांबरीकरण व हॉट मिक्सिंग केले जातील, रस्ते हॉट मिक्सिंग डांबरीकरण करण्याकरिता कंत्राटदारांना निविदा देण्यात आलेल्या आहेत. सध्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, सतत पडलेल्या पावसामुळे ते रखडले होते, या नंतर हॉटमिक्सींग डांबरीकरण करण्याला सुरवात केली जाईल असे शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले.
हणजूण पंचायत क्षेत्रात सार्वजनि बांधकाम खात्यातर्फे रस्त्यावरील खड्डे बुझवण्याच्या (भरण्याच्या) कामास आजपासून सुरवात करण्यात आली, या कामावर आमदार पालयेकर जातीने लक्ष देऊन होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे ( रस्ते विभाग ) अभियंते, कंत्राटदार उपस्थित होते.
फोटो….. हणजूण चिवार येथे रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाची पहाणी करताना आमदार विनोद पालयेकर………. ( रमेश नाईक )