गोवा विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी अखेर पर्यत

.

गोवा विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी अखेर पर्यत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यादृष्टीने सत्ताधारी भाजपने कधीचेच रणशिंग फुंकले असून त्यामानाने काँग्रेस पक्ष बराच पिछाडीवर आहे.मांद्रे मेळावा उलटला,मात्र पक्ष उमेदवारी जाहीर करीत नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे समजते.

दरम्यान,निवडणुकीच्या ऐनक्षणी एखाद्या बलाढ्य नेत्याला पक्षात प्रवेश देऊन काँग्रेस पक्ष मोका साधणार का,अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू असल्याचे कानोसा घेता समजते.

मांद्रे मतदारसंघाची उमेदवारी ठरविण्यास कार्यकर्त्यांची पुन्हा भेट व त्यांच्या सहमतीने उमेदवार निवडला जाईल, असे माजी केंद्रीय गृहमंत्री व गोवा प्रभारी पी चिदंबरम यांनी मांद्रेत सांगितले.त्याच प्रकारचे निवेदन शिवोली,म्हापसा,हळदोणा आदी प्रत्येक मतदारसंघात केल्याचे समजते.तूर्तास चार महिने निवडणुकीस असूनही 115 वर्षे देशांवर राज्य केलेल्या व सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडून निवडणुकीत उमेदवारी ठरू नये, ह्याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. गेली पाच वर्षे विरोधात असूनही ज्या काँग्रेस नेत्यांनी कार्य केले त्यांना कार्यतत्पर राहण्याची सूचना खरे म्हणजे पक्ष नेतृत्वाने द्यायला हवी होती,मात्र सद्यस्थितीत पक्ष उमेदवाराच्या कार्याकडे डोळेझाकपणा करीत असल्याने कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे.

गेल्या पोटनिवडणुकीत ऐनक्षणी उमेदवारी देऊन बाबी बागकर यांना प्रचारासाठी पुरती संधी दिली नाही अशी हाकाटी असूनही ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खास व्युहरचना न केल्याने पक्ष किती गंभीर आहे ह्याचा अंदाज येतो,असे मत कार्यकर्ते व्यक्त करतात.काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मांद्रे भाजपला ‘वॉकओव्हर’ द्यायचा असल्यास उगाच मेळावा व अन्य खटाटोप का करता,असा सवाल एका युवा कार्यकर्त्याने संतप्त विचारला आहे.

कार्यकर्त्यांच्या सहमतीने उमेदवारी ठरविणार असेल तर विलंब का करता,अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत,त्यांनी कार्य सुरू केले असताना,काँग्रेस पक्ष ‘वेट अँड वॉच’ भूमिका का घेत आहेत,असा प्रश्न सामान्य मतदारांना पडला आहे.गेल्या मेळाव्यात जी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती,तीच मागणी कायम असून, त्याचे कार्य व पाठीशी कार्यकर्ते असलेल्या उमेदवाराला प्रोत्साहन देऊन मांद्रेत इतिहास घडविण्याची संधी द्यावी,असे मागणी एका कार्यकर्त्याने सुनावले.

सध्या तरी सत्ताधारी भाजप आघाडीवर असून त्याखालोखाल मगोचे प्राबल्य वाढत असल्याचे संकेत आहेत.त्यामुळे काँग्रेस पक्षाने नवीन चेहऱ्यास उमेदवारी देऊन युवा वर्गाची मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा मतदार व कार्यकर्ते बाळगून  आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar