फूटपाथ बांधकाम व चर्च परिसरात करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणाचा शुभारंभ आमदार पालयेकर यांच्या हस्ते

.
हणजूण येथी नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभाची चाचणी करण्यात आली असून येत्या आठवड्यात हा जलकुंभ कार्यन्वयीत होईल, त्यानंतर हणजूण कायसूववासियांचा  पाण्याचा प्रश्न निश्चित सुटेल, येथील 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम टप्प्याटप्प्याने लवकरच हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती शिवोलीचे आमदार तथा माजी जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी दिली.
           वागातोर येथील सेंट अँथोनी चर्च ते सेंट मायकल हायस्कूल पर्यत 75 लाख खर्चून करण्यात येणाऱ्या फूटपाथ बांधकाम व चर्च परिसरात करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणाचा शुभारंभ आमदार पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी हणजूण कायसूवचे पंचसदस्य पेद्रु मेंडोसा,  असगावचे माजी सरपंच तथा पंचसदस्य जालींदर गावकर, माजी पंचसदस्य प्रताप वेर्णेकर, चर्च चे फादर मार्सेलींनो, मुख्याध्यापिका सिस्टर सिल्वासा, समाजसेवक मायकल मेंडोसा, व ग्रामस्थ उपस्थित होते.
          शिवोली मतदार संघातील अनेक कामे पूर्ण होत आली असून उदघाट्नच्या प्रतीक्षेत आहेत, आणखी 30 टक्के विकासकामे प्रगती पथावर असून निवडणुकी पुर्वी ती पूर्ण होतील, शिवोली मतदार संघाचा कायापालट करणे हाच आपला संकल्प आहे असे पालयेकर यांनी यावेळी सांगितले.
         या ठिकाणी सुशोभीकरण करावे या करिता दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता, आज प्रत्यक्षात कामाला सुरवात झाल्याने आमदार विनोद पालयेकर यांना चर्च च्या वतीने धन्यवाद देत असल्याचे फादर मार्सेलीन यांनी सांगितले.
      फोटो……… वागातोर येथे सुशोभीकरण व फूटपाथ बांधकामाचा नारळ वाढवून शुभारंभ करताना फादर मार्सेलीन  सोबत आमदार विनोद पालयेकर, सिस्टर सिल्वासा, पेद्रु मेंडोसा,  जालींदर गावकर व इतर ……… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar