नागवा येथे महिला मंडळाचे दुकान व हॉटेलचे उदघाट्न

.
गोव्यातील महिलांचे सशक्तिकरण व्हावे हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते, गोव्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात याकरिता त्यांचा प्रयत्न होता, नागवा येथे महिला गटाकरिता जसे त्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्री करिता दुकान व रेस्टॉरंट  सुरू करण्यात आलेले आहे तशीच दुकाने व रेस्टॉरंट गोव्यातील इतर महिला गटांना उपलब्ध करून दिल्यास मनोहर पर्रीकरांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी केले.
            नागवा, बार्देश येथे स्त्री शक्ती अभियानाअंतर्गत “महिला मंडळ स्टोअर अँड रेस्टॉरंट” चे उदघाट्न मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पर्रा च्या सरपंच डिलायला लोबो, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, हडफडे नागवाचे सरपंच राजेश मोरजकर व इतर पंचसदस्य, कळंगुट चे सरपंच शॉन मार्टिन्स, सडये शिवोलीचे सरपंच निलेश वायंगणकर, वेर्ला काणकाच्या सरपंच अमिता कोरगावकर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक मीना गोलतेकर, नागवाच्या महिला अध्यक्ष सुषमा नागवेकर तसेच कळंगुट व शिवोली मतदार संघातील पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य उपस्थित होते.
            महिलागटासाठी उपलब्ध करून दिलेल्या दुकानात महिलांनी सणासुदिला लागणारे गोमंतकीय खाद्यपदार्थ उपलब्ध करावेत तसेच हॉटेलात गोमंतकीय पद्धतीचे जेवण व इतर खाद्यपदार्थ उपलब्ध केल्यास स्थानिकांबरोबर पर्यटकही आकर्षित होतील असे मंत्री लोबो यांनी सांगितले.
        नागवा येथील हे दुकान नऊ महिला गटांनी मिळून सुरू केले आहे, अशीच दुकाने व महिलांच्या गटांची हॉटेल्स गावागावात सुरू झाल्यास स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत होण्यास वेळ लागणार नाही असे डिलायला लोबो यांनी सांगितले.
          दुकाने चालवताना महिलांना अडचणी येणार पण कोणतेही हेवेदावे न करता एकमेकांच्या सहकार्याने प्रगती करावी असे ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक मीना गोलतेकर यांनी सांगितले.यावेळी दत्तप्रसाद दाभोळकर,  निलेश वायंगणकर यांनीही आपले विचार मांडले.
     फोटो……… नागवा येथे महिला मंडळाचे दुकान व हॉटेलचे उदघाट्न फीत कापून उदघाट्न करताना ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो, सोबत डिलायला लोबो, सुषमा नागवेकर व इतर मान्यवर……. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें