कला हे माणसाला देवाने दिलेले वरदान आहे. आपल्याला कलेच्या रूपात देवाने जी शब्दांची, अक्षरांची शक्ती दिलेली आहे, त्याचा चांगला उपयोग होण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे आणि समाजापर्यंत ती पोहोचायला पाहिजे, तरच त्याला मौलिकता प्राप्त हाते. ज्याच्याकडे पुस्तक नसते, त्याच्याकडे मस्तकही नसते, असे प्रतिपादन प्रा. अनिल सामंत यांनी केले.
करासवाडा-म्हापसा येथील ‘गणेश गुरुकुल’तर्फे आयोजित ‘टाळेबंदी आणि मी’ या विषयावरील निबंधलेखन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की आपण सगळे जण लेखक आहात, त्यासाठी चांगल्या लेखकांचे भरपूर वाचन झाले पाहिजे. प्रत्येकाकडे उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह असायला पाहिजे.
मानसी प्रभू, जयशीला आणि सुनिता यांनी सादर केलेल्या शारदास्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश गुरुकुलच्या संचालिका सुषमा नार्वेकर यांनी मान्यवर तसेच सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कोविड महामारीच्या काळात बंद ठेवण्यात आलेल्या गणेश गुरुकुलमध्ये यापुढे पुन्हा अशा प्रकारचे उपक्रम सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित विजेत्यांनी तसेच इतरांनी स्वत:ची ओळख करून देऊन मनोगते थोडक्यात मांडली. आरती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिल्पा नायक यांनी केलेल्या आभारप्रकटनाने कार्यकमाची सांगता झाली.
घेण्यात निबंधलेखन स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे: महिला गट: प्रथम : मिनल देसाई, द्वितीय अनघा नेरूरकर व माधुरी उसगावकर, तृतीय : शिल्पा नायक व डॉ. स्वाती अणवेकर. उत्तेजनार्थ : अनुजा कामत व संगीता पत्की. पुरुष गट : प्रथम : दौलतराव खानविलकर, द्वितीय : यशवंत शेट्ये, तृतीय : राजेश नकाशे, उत्तेजनार्थ : धर्मानंद मोरजकर व सुनील दीक्षित.
फोटो……….म्हापसा येथील गणेश गुरुकुल’ने आयोजित केलेल्यास निबंधलेखन स्पर्धेच्या बक्षीसवितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे प्रा. अनिल सामंत व संचालिका सुषमा नार्वेकर यांच्यासमवेत विजेते स्पर्धक