म्हापसा पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी कारवाई

.
म्हापसा   /   प्रतिनिधी
        म्हापसा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत ओडिसाच्या युवकास अटक करून सुमारे 3 लाखाचा अंमली पदार्थ जप्त केला.
        मिळालेल्या माहितीनुसार पर्रा येथे पदार्थाची विक्री होणार असल्याची खबर म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांना मिळाल्यानंतर निरीक्षक लोटलीकर यांनी उपनिरीक्षक गौरव नाईक, उपनिरीक्षक विभा वळवयिकर, हवालदार सुशांत चोपडेकर, पोलीस शिपाई प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, राजेश कानोळकर, अक्षय पाटील या पोलीस पथकासह धाड टाकून पर्रा येथे संशयितरित्या घुटमळणाऱ्या बियांती गांथीरत्न माली  (29) रा. गजापती, ओडिसा याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे 3.010 किलो वजनाचा तीन लाख किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला.
         म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून अंमली पदार्थ ताब्यात घेतला, माली याचे विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली असून पुढील तपास उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
        फोटो…… अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केलेल्या संशयीतासह म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर व इतर सहकारी………. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar