हणजूण येथे जलकुंभाचे उदघाटन करताना आमदार विनोद पालयेकर सोबत सरपंच सावियो अल्मेदा

.

म्हापसा दि. 27 (  प्रतिनिधी )

         हणजूण येथील नवीन पाण्याची टाकी कार्यन्वयीत झाल्याने हणजूण, वागातोर, कायसूव-शापोरा येथील जनतेची पाण्याची समस्या काही प्रमाणात नक्की सुटेल. या टाकीतून पाणी पुरवठ्याचे सर्वेक्षण केले जाईल व लवकरच येथील अभियंता व व्हॉल्व ऑपरेटर यांची बैठक घेऊन सर्व प्रभागातील लोकांना समान पाणी मिळेल या करिता प्रयत्न केला जाईल असे शिवोली चे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले.
          हणजूण येथे नव्याने बांधलेल्या 300 क्यूबिक मीटर च्या जलकुंभाचे उदघाट्न आमदार पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हणजूण कायसूवचे सरपंच सावियो अल्मेदा, पंचसदस्य पेद्रु मेंडोसा, प्रतिमा गोवेकर, आसगावचे माजी सरपंच जालींदर गावकर, इतर ग्रामस्थ तसेच पाणीपुरवठा खात्याचे अभियंता सहाय्यक अभियंता उपस्थित होते.
          हणजूण कायसूव येथील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत होती. पाणी पुरवठ्यासाठी या डोंगर माथ्यावर 800 क्यूबिक मीटर ची टाकी बांधून ठेवण्यात आली होती पण अस्नोडा पाणी प्रकल्पातून येणाऱ्या जलवाहिनीतून पुरेसे पाणी या टाकीत चढतं नसल्याने ती विनावापर पडून होती, आता ही दुसरी टाकी पायथ्याशी बांधण्यात आल्याने त्या टाकीतून पाणी वर चढवले जाईल, आणी त्यातून पाणी पुरवठा होईल असे आमदार पालयेकर यांनी सांगितले.
         सुरवातीला मायकल मेंडोसा यांनी सर्वांचे स्वागत करून अभियंत्याकडे पाणी पुरवठ्याच्या समस्या मांडल्या. यावेळी सरपंच सावियो अल्मेदा यांनीही हणजूण कायसूव वासियांना पाणी समस्येला बरीच वर्षे तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले. निदान आता तरी पाणी पुरवठ्याची समस्या सुटेल असे सांगितले.
        फोटो……हणजूण येथे जलकुंभाचे उदघाटन करताना आमदार विनोद पालयेकर सोबत सरपंच सावियो अल्मेदा व इतर…….. ( रमेश नाईक)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar