आसगाव येथील अल शदाय धर्मदाय न्यास संचालित अनाथाश्रमातीला कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने उदघाटन करताना राज्यपाल श्रीधरन पिल्लई,

.
म्हापसा दि. 27   ( प्रतिनिधी )
    भारताची वाटचाल यशाकडे चाललेली आहे कारण भारतीयांच्या मनात रुजलेली ” सर्व धर्म समभाव ” ची संस्कृती, धर्म जरी वेगळे असले तरी सर्वांचे अंतिम ध्येय एकच आहे असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी केले.
          मुणांग, आसगाव येथील अल-शदाय धर्मदाय न्यास संचलित अनाथाश्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात राज्यपाल पिल्लई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यपाल निधीतून अल शधाय न्यासास आर्थिक मदत दिली तसेच आसगाव येथील दोन डायलेसिस च्या महिला रुग्णांना आथिर्क मदत दिली.
      यावेळी अल शधाय धर्मदाय न्यासाचे सहसंस्थापक मॅथ्यू कुरियन, शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा, सलगावचे आमदार जयेश साळगावकर, आसगाव पंचायतीच्या प्रभारी सरपंच रिया नाईक व्यासपीठावर उपस्थित होते तर मान्यवरात थंडर फोर्स ली. गोवाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बी. नय्यर, उद्योजक सॅम कुझीकाला, फाग्मा चे अध्यक्ष वासू नय्यर, देवी नय्यर, वस्तूविशारद रिटा मोदी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मामू हेगे, फा. अब्राहम शिजोम, फा. वर्गिस, स्नेहल साळगावकर, एडवीन फोन्सेका आदी मान्यवर उपस्थित होते.
         मानव सेवा हाच खरा धर्म, जन्माला येताना कोणीही अनाथ नसतो पण नंतर त्याला छत्रछाया मिळते, अनाथाश्रमाला मदत करणे मी आपले कर्तव्य समजतो, म्हणूनच मी सर्व धर्माच्या अनाथाश्रमाना भेटी दिल्या आहेत असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. यावेळी आमदार जोशुआ डिसोझा, आमदार जयेश साळगावकर, आमदार विनोद पालयेकर यांनी आपले विचार व्यक्त करून अल शदाय न्यासास सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
…………………….
        गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती बद्दल आपण बोलणे योग्य नव्हे, आपण लोकप्रतिनिधी नसून राष्ट्रपतीनी नियुक्त केलेला प्रतिनिधी आहे असे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांकडे बोलताना सांगितले.
………………..
  फोटो….. आसगाव येथील अल शदाय धर्मदाय न्यास संचालित अनाथाश्रमातीला कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने उदघाटन करताना राज्यपाल श्रीधरन पिल्लई, सोबत आमदार जोशुआ डिसोझा, आमदार जयेश साळगावकर, आमदार विनोद पालयेकर, प्रभारी सरपंच रिया नाईक व मॅथ्यू कुरियन…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar