हळदोणे मतदारसंघातील नास्नोडा पंचायतीचे विद्यमान पंच सदस्य आणि माजी सरपंच गोविंद पुंडलिक गोवेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला.

.

दिनांक: २६ ऑक्टोबर २०२१

हळदोणे मतदारसंघातील नास्नोडा पंचायतीचे विद्यमान पंच सदस्य आणि माजी सरपंच गोविंद पुंडलिक गोवेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला


. ते श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतन समितीचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हळदोणे मतदारसंघ अध्यक्ष, गोमंतक भंडारी समाजाचे हळदोणे मतदारसंघ उपाध्यक्ष आहेत.
२०१९ मध्दे शिरसई मतदारसंघ जिल्हा पंचायत निवडणूक लढवली होती.
भाजपचे माजी पदाधिकारी होते.

दिलीप मालदार श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतन समितीचे खजिनदार, उपसचिव स्वप्निल बिलवालकर, एटर्नी सुशांत मयेकर, उप एटर्नी सुमीत नाईक, उप खजिनदार तनय नागवेकर, ॐ शिव रवळनाथ महिला घुमट आरती गटाच्या अध्यक्षा मेधा वायंगणकर, प्रतिमा गोवेकर, वंदना नाईक, ब्रुनो रोड्रिग्ज, चार्ली डिसुझा, आकाश कोरगावकर, सागर बिचोलकर, राजन तुयेकर, रोहिदास नाईक, चंद्रकांत नाईक, साहिल सरमळकर यांनी सोबत प्रवेश केला.

यथा नाम तथा गुण ही म्हण गोव्याचे माजी माननीय राज्यपाल आणि मेघालयाचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलीक यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. स्पष्टवक्तेपणामुळे ते गोव्यात लोकप्रिय होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा खोटारडेपणा आणि गलथानपणा त्यांनी उघड केला होता.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत मायनींगच्या कारभारात मुख्यमंत्री आणि सरकारातील काही मंत्री गुंतले असल्यामुळे टाळेबंदी करण्यास मुख्यमंत्री टाळाटाळ करीत असून त्यामुळे कोविड फोफावत असल्याचा जो सर्वप्रथम आरोप शिवसेनेनं केला होता त्याची पुष्टी आज माननीय राज्यपालांनी केली आहे.
माननीय राज्यपाल यांनी कोविड आणि सर्वच कारभारात सावंत सरकार भ्रष्टाचार करीत असल्याच्या केलेल्या  गौप्यस्फोटामुळे हे सिद्ध होत आहे की कोविड मुळे दगावलेल्या बहुसंख्य लोकांच्या मृत्यूला सरकार कारणीभूत आहे. भ्रष्टाचाराचे प्रतिक असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात झालेल्या लोकांच्या मृत्युंनाही भाजप सरकारच जबाबदार आहे. एका प्रकारे हा सामुहिक खुन असून विद्यमान माननीय राज्यपाल पिल्ले यांनी सदर भाजप सरकार बरखास्त करून प्रमोद सावंत यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे. गोयकारांच्या हितासाठी प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राज्यपालांना साकडे घालण्याची गरज व्यक्त केली आहे. शिवसेना गोवा राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्तीची मागणी करणार.
राज्यपाल मलीक यांनी पंतप्रधान मोदि यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्याकडेच चौकशी करण्यात आल्याबद्दल जी नाराजी व्यक्त केली आहे असाच वाईट अनुभव ऑक्सिजन अभावी रात्री मृत्यू होण्याच्या तक्रारी बाबतीतही झाले असल्याचे कामत यांनी सांगितले.
स्वयंपुर्ण युवा कार्यक्रम सुरु केला आहे. नोकरी मिळवणे हा हक्क आहे. पण नोकरीच्या बदल्यात मत घालणं अनिवार्य नाही. नोकरीसाठी किंवा इतर आमिषांना बळी पडून या श्रापीत भाजप सरकाराला साथ देणाऱ्यांनाही नोकरी बरोबर मोफत श्रापांची भागीदारी मिळणार असल्याचे वक्तव्य कामत यांनी केले आहे.
सरचिटणीस मिलिंद गावस, उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट पेरेरा, हळदोणे मतदारसंघ प्रमुख रमेश मटकर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें