३० रोजी केरी सत्तरीत कलाकार गुण गौरव* *संगीत मत्स्यगंधा नाटकाचा प्रयोग*

.

*३० रोजी केरी सत्तरीत कलाकार गुण गौरव*
*संगीत मत्स्यगंधा नाटकाचा प्रयोग*

पणजी
संगीत आणि नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वर सत्तरीतर्फे केरी सत्तरी येथे कलाकार गुण गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थान सभागृहात सायंकाळी ५.३० वा. संपन्न होणाऱ्या सोहळ्याला कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, माजी मुख्यमंत्री तसेच पर्येचे विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे, बालभवन गोवाच्या माजी अध्यक्षा विजयादेवी राणे, केरीचे सरपंच सय्यद दाऊद गणी, नाट्य दिग्दर्शक शिवनाथ नाईक, श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर माजिक आणि स्वर संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत गावस, स्वर सत्तरीचे अध्यक्ष उदयसिंग राणे, संस्थापक विठ्ठल गावस आणि सचिव अजीत गांवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राजीव गांधी कला मंदिर फोंडा आयोजित अखिल गोवा महिला नाट्य स्पर्धेत सतत तीन वर्षे प्रथम पारितोषिक प्राप्त महिला नाट्य कलाकार तसेच स्वर सत्तरीतर्फे निर्मिती केलेल्या विविध नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
गौरव सोहळ्यानंतर राजीव गांधी कला मंदिर आयोजित राज्य स्तरीय महिला नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषीक प्राप्त संगीत मत्स्यगंधा या नाटकाचा प्रयोग होणार आहे. शिवनाथ नाईक यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून संगीत साथ महेश गावस आणि शैलेश शिरोडकर यांची आहे. कोविड नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला रसीक प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन स्वर सत्तरीतर्फे करण्यात येत आहे.

(फोटो कॅप्शन – संगीत मत्स्यगंधा नाटकातील महिला कलाकार)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar