ओबिसी, ओबिसी आणि ओबिसी

.

* विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशा अनेक क्लुप्त्यांचा आधार घेऊन खासकरून सत्ताधारी राजकीय पक्षांकडून माणसं किंबहुना मतदारांना आकर्षित व गोळा करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील ओबिसीत समावेश व्हावा अशा इच्छुकांच्या काही ज्येष्ठ समाज नेते मंडळींशी संपर्क साधला जात असून व त्या त्या समाजातील राजकीय वर्तुळात संबंधित असलेल्या ज्येष्ठ व्यक्ती आपल्या संपर्कातील समाजातील ओबिसी इच्छुक गटात ओबिसीत समावेश पक्का होणार आहे अशा बाता मारुन स्वताच वजन वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत . एकंदरीत ओबिसीत समावेश करण्याचा किंबहुना समावेश व्हावा हा विषय सध्या राज्यात बऱ्यापैकी गाजत आहे .

कित्येक वर्षांपासून समाजाची मुळ पिढीजात ओळख अबाधित ठेवून ओबिसीत समावेश नको म्हणत सरकारी सुविधां किंबहुना कुबड्यांच्या आधार न घेता स्वकर्तृत्वावर वाटचाल करुन तसेच खर्या अर्थानं इतर समाजाला स्वावलंबनाचे उदाहरण देत बऱ्यापैकी मजल मारलेल्या अशा समाजात सुद्धा दुर्दैवाने दोन गट पडल्याची प्रकरणं समोर येत आहेत.

तसे ओबिसीत समावेश असलेल्या समाजात सुद्धा उघडपणे ह्या ना त्या कारणावरून जसे सरसकट छाननी न करता ओबिसी प्रमाणपत्रे देण्यात येत असलेल्या कारणांवरून भांडणतंटे होऊन सरळ सरळ दोन गट पडल्याचेही दृष्टीस पडत आहे .

एखाद्या समाजाचा नियमांनुसार ओबिसीत समावेश होऊच शकत नाही म्हणुन आक्षेप घेतला जात आहे अशीही प्रकरणं समोर येत आहेत .

असेही दृष्टीस पडत आहे की समाजातील एक, दोन ज्येष्ठ मंडळी आपल्या मर्जीतील मंडळीना विश्वासात घेऊन ह्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा लाभ ऊठवुन राजकीय वर्तुळात आपलं स्थान बळकट करून घेण्यासाठी तसेच आपल्या पाल्यांच्या नोकरी विषयक स्वार्थ हेतुने समाजाचा ओबिसीत समावेश व्हावा ह्यावर जोर देत समाजाचा ओबिसीत समावेश व्हावा व अजिबात व्हायला नको अशी दुफळी निर्माण होत आहे ह्यावर सुद्धा मागेपुढे न पाहता दुर्लक्ष करून कार्यरत आहेत .

* कित्येक वर्षांपासून चालु असलेली हि ओबिसी पद्धत खर म्हणजे बंद झाली पाहिजे असा सुर सुशिक्षित व विचारवंताकडुन ऐकु येत आहे ह्यावर सरकार का गांभिर्याने घेत नाही हे तसे उघड आहेच म्हणा… कारण ह्या विषयावरूनच निवडणूकां मधुन सरकारं घडत असतात.
ह्यावरून खरतर उघडपणे मोठा आवाज उठवून सरकारला ओबिसी पद्धत बंद पाडण्यास भाग पाडले पाहिजे पण ह्या उलट अजुनही ओबिसीत समावेश व्हावा व शॉर्टकट पद्धतीनुसार सुविधांचा (किंबहुना कुबड्यांचा) आधार घेऊन जिवन सार्थकी लाभावे अशी भावना अजुनही येणार्या भावी पिढीत रुजु करु पाहणारी कर्मदरिद्री मंडळी कार्यरत आहे .

शेवटी ह्या
“ओबिसी कुबड्यांचे ” समर्थन करणार्या व शॉर्टकट पद्धतीनुसार जीवनाची वाटचाल व्हावी अशा विचारसरणींच्या मंडळीना कसे कुणी वठणीवर किंवा भानावर आणावे हाच मोठा प्रश्न सद्या भेडसावत आहे .
🤔

सुदेश प्रभाकर तिवरेकर
खोर्ली ,
म्हापसा – गोवा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar