मीटर मोफत, तर पैसे का भरावेत

.

हरमल प्रतिनिधी

गोवा सरकारने पर्यटन हंगामात टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांना डिजिटल मीटरची सक्ती करून आर्थिक नुकसानीत लोटले आहे,आधीच कोविडची विदारक स्थिती व पर्यटन हंगामाची सकाळ नाही,त्यात 31 ऑक्टोबरपर्यत मीटर सक्तीचे  असल्याने व्यावसायिक चिंतेत असून किमान चार महिन्याची मुदत वाढवून देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

सरकारने आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्य व्यावसायिक व जनतेला रस्त्यावर आणले आहे प्रत्येक मागण्यासाठी जनता आक्रोश करीत आहेत हे सुशासनाचे लक्षण नसून भाजपने सुडाचे राजकारण असल्याची भावना टॅक्सी व्यवसायिकांत
पसरली आहे.

दरम्यान, आश्वासन न पाळल्याने,आगामी निवडणुकीत भाजपला दणका देण्याचा विचार असून टॅक्सी व्यावसायिक आपला उमेदवार उभा करण्याच्या उद्देशाने बैठका घेत असल्याचे दिसून येते.

गेले वर्षभर डिजिटल मीटर सक्तीची टांगती तलवार टॅक्सी व्यावसायिकांच्या डोक्यावर आहे.वाहतूक खात्याचा हेकेखोरपणा आर्थिक विवंचनेत असलेल्या स्वयंरोजगार टॅक्सी व्यावसायिकांना नकोसा झाला आहे.कोविडच्या परिस्थिती मुळे टॅक्सी व्यवसाय पूर्णतः कोलमडून गेला असून पुन्हा सुरू करायचा झाल्यास पन्नास साठ हजार रुपये खर्च असल्याने डिजिटल मीटरसाठी आगाऊ पैसे भरणे कठीण झाले असून सरकारचा मीटर मोफत देण्याची घोषणा वरातीमागून घोडे असा प्रकार असल्याचे टॅक्सी व्यावसायिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

सद्यस्थितीत टॅक्सी व्यवसाय जवळजवळ ठप्प आहे.पर्यटन हंगाम सुरू नसल्याने टॅक्सी जाग्यावरच धूळ खात पडून आहेत.कित्येक टॅक्सीचे परवाने,विमा,बॅटरी व अन्य दुरुस्तीसाठी आवश्यक तजवीज करण्यासाठी ऋणाशिवाय पर्याय नाही. दोन वर्षे थकलेले बँकेचे हप्ते व खाजगी व्याजावर घेतलेले पैसे फेडण्याची ऐपत नसल्याने कित्येकजण नैराश्याने ग्रासले आहेत तर काहीजण मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी सांगितले.कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण असताना मीटरसाठी पैसे कोठून आणायचे हा अनुत्तरित प्रश्न आहे.

31 ऑक्टोबरची मुदत वाढवा——

सध्या टॅक्सीचे परवाने नूतनीकरण करण्यास डिजिटल मीटर सक्तीचा केला आहे.त्यामुळे 31 ऑक्टोबर ही अंतिम मुदत असल्याचे वाहतूक खात्याने टॅक्सी व्यावसायिकाला कळविले आहे.सरकार मोफत मीटरची घोषणा करते व त्याच टॅक्सी व्यावसायिकाला मीटरसाठी 12 हजार रुपये भरण्याची सक्ती करतो,हे कसे काय, असा सवाल व्यावसायिक करीत आहेत.त्यापेक्षा ती मुदत वाढवा व टॅक्सी आढळल्यास दंड वसूल करावा अशी मागणी केली आहे.

….मीटर मोफत, तर पैसे का भरावेत—-
सरकारने टॅक्सी व्यावसायिकांना मोफत मीटरची घोषणा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा,टॅक्सी व्यावसायिकांचे हित राखल्याचा आव आणला,प्रत्यक्षात व्यावसायिकांना भिकेला लावले असा आरोप केला आहे.कुठल्या न्यायाने पैसे भरण्याची सक्ती करीत आहात व ते हप्त्याने पुन्हा देणार असाल, तर भरण्याची सक्ती का, असा सवाल टॅक्सी व्यावसायिक करीत आहेत.

दरम्यान, टॅक्सी व्यावसायिकांनी मुख्यमंत्री, मंत्री व आमदारांच्या घराचे उंबरठे झिजविले, मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही व मिळण्याची शक्यता कमीच असल्याने, निराश टॅक्सी व्यावसायिक धंदाच बंद करण्याची शक्यता बोलून दाखवीत आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar