म्हापसा दि. 29 ( प्रतिनिधी )
हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत पश्चिम बंगालच्या दोघा युवकांना अटक करून सुमारे पाच लाखाचा अंमली पदार्थ जप्त केला.दि.29 रोजी पहाटे 1.50 वा. ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार हडफडे बागा येथील बागा नदीवरील पुलाजवळ अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खबर हणजूण पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फ्रांसिस्को झेवियर यांनी हवालदार श्यामसुंदर पार्सेकर, पोलीस शिपाई अवीर कलंगुटकर, विठ्ठल घाडी, शंबा शेटगावकर, दिपेश चोडणकर यांच्यासह सापळा रचला असता पहाटे 1.50 च्या दरम्यान GA03W9084 या ऍक्टिवा स्कुटर वरून रशीद मोतेलेव मंडल (29) व लैजूर गुलाम मुस्तफा मौल्ला (26) दोघेही मूळ. प. बंगाल सध्या रा. आगरवाडा, कळंगुट हे दोघे संशयितरित्या तेथे येऊन थांबले, हणजूण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच किलो वजनाचा सुमारे पाच लाख किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला.
रितसर पंचनामा करून हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ व स्कुटर ताब्यात घेतली तसेच मंडल व मौल्ला या दोघा विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक फ्रांसिस्को झेवियर हे निरीक्षक सुरज गावस, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
फोटो …….. अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केलेल्या संशयीतासह उपनिरीक्षक फ्रांसिस्को झेवियर व इतर पोलीस सहकारी………… ( रमेश नाईक )