श्री दोरा काकुलो महाविद्यालय व सम्राट क्लब म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हापसा येथील काकुलो महाविद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन डॉ. संतोष पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की आज रक्तदाबाची खूप गरज आहे
रक्तदानामुळे आपण एखाद्याचा जीवदान देऊ शकतो, एखाद्याचे जीव वाचवू शकतो.
या वेळी उपप्राचार्य शर्मिल बोरकर, सम्राट क्लब म्हाळसा अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर, प्रकाश धुमाळ अमिन खान, नितीन नेवगी, संदीप वालावलकर, डॉ. जयेश चुरी, अभय हजारे, अमिन खान आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. क्लेव डेमेलो, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सदाशिव मंगेशकर, नर्स माया कुलकर्णी, टेक्नीशियन पियादाद, संदीप चोडणकर, अनिल सुलैकर यांनी सहाय्य केले
कायक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश ताम्हणकर यांनी केले.