कृपया प्रसिद्धी साठी करोना काळातील मरगळ झटकून प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागून येत्या काळात भारतमाता की जय संघाच्या किमान दोनशे शाखा गोव्यात सुरू व्हायला हव्यात, यास आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे मत भारतमाता की जय संघाचे संघचालक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी व्यक्त केले.
भारतमाता की जय संघाच्या फोंडा -पंचवाडी येथे आयोजित केलेल्या दिवाळी वर्ग कार्यकर्ता मेळाव्यात श्री. वेलिंगकर बोलत होते. यावेळी ३४८ कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात प्रत्यक्ष सहभाग दर्शविला. ही या मेळाव्याची जमेची बाजू मानली जाते.
अशा मेळाव्यात जबाबदार भारतिय नागरिक तयार करण्याची संधी असते, आणि ती प्रत्येकाने घेतली पाहीजे.
वर्गास संध्याकाळी सात वाजता प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांचे स्वागत, वर्ग उद्घाटन, परिचय, नियुक्ती, सूचना, प्रार्थना, गण विभाजन आणि दीप प्रज्वलन यासारखे कार्यक्रम संपन्न झाले.
३० रोजी ध्वजारोहण, शारीरिक कवायत, बौद्धिक क्षमता वाढवण्याचे कार्यक्रम राबविले गेले. या वर्गाच्या एकंदर आयोजनामध्ये वर्ग संचलनाच्या विविध जबाबदाऱ्या कार्यकर्त्याने प्रभावीपणे सांभाळल्या.
यावेळी वर्ग अधिकारी म्हणून श्री देविदास जयवंत सराफ तर वर्ग कार्यवाह म्हणून परेश पणशीकर उपस्थित होते.उत्तर , मध्य व दक्षिण गोवा यामधून विद्यार्थी ,व्यवसायिक तरुण , वर्ग शिक्षक असे मिळून एकूण ३४८ स्वयंसेवक सहभागी झाले होते .रविवारी दिनांक ३१ रोजी सकाळी या वर्गाचा समारोप होणार आहे.