नितळ गोय, स्वच्छ गोय’

.

नितळ गोय, स्वच्छ गोय’ह्या संकल्पनेस अनुसरून गांवातील व्यावसायिक व ग्रामस्थांनी प्लास्टिक कचरा जाळू नये तसेच कचरा अस्ताव्यस्त उघड्यावर न फेकता, कंत्राटदाराला द्यावा असे आवाहन कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदर्श नाईक व सरपंच मनोहर केरकर यांनी केले आहे.

गेली अनेक वर्षे पंचायत समितीतर्फे कचरा व्यवस्थापन समिती कार्यरत आहे.पर्यटनस्थळ स्वच्छ ठेवण्यासाठी व्यावसायिकांची मदत महत्वाची असते.त्यासाठी शॅक्स वगळता अन्य रेस्टॉरंट, हातगाडे, दुकाने व हंगामी पर्यटन संबंधित व्यवसाय आदीकडून कचऱ्याच्या उचलीसाठी ठराविक शुल्क आकारले जाते.त्या शुल्कातून वर्षभरासाठी कचऱ्याची उचल करण्यास कंत्राटदार नेमला जातो.त्या कंत्राटदाराला गांवातील व्यावसायिक व सार्वजनिक ठिकाणाचा कचरा गोळा करून साळगांव कचरा प्रकल्पात पाठविण्याची सोय करण्याचे बंधनकारक केले असल्याचे अध्यक्ष आदर्श नाईक व सरपंच मनोहर केरकर यांनी सांगितले.

व्यावसायिकांनी स्वच्छतेसाठी शुल्क भरावे—
पर्यटनस्थळ हरमल स्वच्छ असल्यास भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या निश्चितच वाढणार,त्यायोगे उलाढाल व व्यवसायवृद्धी होणार असतो.
ह्या हेतूने गावाच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक व्यावसायिकाने शुल्क भरावे असे आवाहन अध्यक्ष नाईक यांनी केले आहे.ह्या भागांत काहींनी हॉटेल्स भाडेपट्टीवर चालवायला दिली असल्याने पंचायतीचे ठराविक शुल्क भरून घेणे गरजेचे आहे. त्याबाबतीत कसलीच तडजोड न करता,सामाजिक बांधिलकी मानून प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे असे आवाहन सरपंच मनोहर केरकर यांनी केले आहे.दरम्यान आगामी वर्षासाठी 1 नोव्हेंबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2022  नवीन कंत्राटदाराकडून कचऱ्याची उचल सुरू केली जाईल,असे अध्यक्ष आदर्श नाईक यांनी सांगितले.

पंचायतीची एम आर एफ सुविधा निकाली—
अलीकडेच पंचायत संचालनालयने न्यायालयाच्या निकालानंतर हरमल पंचायतीस एमआरएफ सुविधा न केल्याने,पंचायतीच्या परवाने व अन्य प्रकारच्या अधिकारावर निर्बंध लादले होते.एका जमीनदाराने याप्रश्नी सामंजस्याची भूमिका घेत पंचायतीला सहकार्य केले व सुविधा उपलब्ध केली, त्याबद्दल त्या जमीनदाराचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले, अशी माहिती सरपंच मनोहर केरकर यांनी दिली.त्यामुळे सरकारने लादलेले निर्बंध मागे घेण्यात येईल,असे सरपंच केरकर यांनी सांगितले.

ह्या बैठकीत उपसरपंच बर्नार्ड फेर्नांडिस, पंच दिव्या दिलीप वायंगणकर,अनंत गडेकर, इनासियो डिसौझा, प्रवीण वायंगणकर तसेच सूर्यकांत कोरकणकर, सेबी डिसौझा,प्रितेश परसाई आदीनी चर्चेत भाग घेतला.शेवटी समितीचे सचिव चंद्रहास दाभोलकर यांनी आभार मानले.

फोटो
हरमल: कचरा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सरपंच मनोहर केरकर सोबत समितीचे अध्यक्ष आदर्श नाईक,उपसरपंच बर्नार्ड फेर्नांडिस,पंच अनंत गडेकर, दिव्या वायंगणकर,प्रविण वायंगणकर व सूर्यकांत कोरकणकरव अन्य

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar