वसुदैव कुटूंबकम ही संस्कृती भारतातच रुजलेली आहे:राज्यपाल श्रीधरन पिल्लई

.

म्हापसा दि. 30   ( प्रतिनिधी )

        भारतीय संस्कृती व परंपरा जगात सर्वात श्रेष्ठ आहे, वसुदैव कुटूंबकम ही संस्कृती भारतातच रुजलेली आहे, या संस्कृतीच्या पगड्यामुळे आपल्यातील काही जण गरीब व अनाथ महिला व वृद्धांची सेवा करण्याकरिता पुढे येतात असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.
        हणजूण झरमुड्डी येथील गोमंतक लोकसेवा न्यास संचालित महिलाश्रमाला राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी सदिच्छा भेट देऊन पहाणी केली व या महिलाश्रमाला आर्थिक मदत म्हणून राज्यपाल निधीतून एक लाख रुपयांचा धनादेश दिला. या वेळी व्यासपीठावर गोमंतक लोकसेवा न्यासाचे अध्यक्ष अवधूत स्वार, संचालक मधुरा बांदेकर, व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रतिमा गोवेकर उपस्थित होते.
          यावेळी बोलताना त्यांनी मिज़ोरामच्या काही आठवणी सांगून दरडोई उत्पन्नात गोवा हे सर्वात श्रीमंत राज्य आहे पण सर्वात सुखी राज्यात मिज़ोराम क्रमांक एक वर आहे. समाजातील काही दिन व गरीब घटकासाठी गोमंतक लोकसेवा ट्रस्ट च्या मानवसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रिदाप्रमाणे त्यांच्या प्रती जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करूया असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले.
        सुरवातीला व्यवस्थापक समितीचे पदाधिकारी शिवाजी गावस यांनी राज्यपाल पिल्लई यांची ओळख करून दिली. संचालक मधुरा बांदेकर यांनी महिलांश्रमाच्या कार्याची माहिती दिली तर राजेश माणगावकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ सावंत यांनी केले.
       फोटो ………… हणजूण येथील महिलाश्रमाला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करताना राज्यपाल श्रीधरन पिल्लई, सोबत अवधूत स्वार, मधुरा बांदेकर, प्रतिमा गोवेकर व इतर…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar