खांडोळा सांतइस्तेव्ह येथे जबर मारहाणीमुळे एकाचा मृत्यू

.

फोंडा प्रतिनिधी – खांडोळा सांतइस्तेव्ह येथे जबर मारहाणीमुळे एकाचा मृत्यू होण्याचा प्रकार घडला असून फोंडा पोलिसानी यासंबंधी अज्ञाता विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार आज रविवारी उघडकीस आला. मयताचे नाव हरींदर हिरालाल प्रसाद वय ४४ असे असून तो मूळ बिहारचा आहे.
खांडोळा – सांतइस्तेव्ह पुलाच्या खाली नदीच्या काठावर एकजण रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिकानी १०८ रुग्णवाहिकेला दिल्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने बेतकी आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र इस्पितळात नेत असताना दारातच त्याचे निधन झाले. डॉक्टरांनी हरिंदर प्रसाद याला मृत घोषित करून प्रकरण मारहाणीचे असल्याने फोंडा पोलिसाना कळवले.
पोलिसांनी इस्पितळात धाव घेतल्यानंतर मयताच्या डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमा आढळल्या. अज्ञाताने त्याच्यावर वार करून त्याला गंभीर जखमी करून तसाच टाकला व पळ काढला असावा असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
मयत मूळ बिहारचा असून तो अमयवाडा – खांडोळा येथे भाड्याच्या खोलीत राहत होता अशी माहिती देण्यात आली. मृत हरींदर व त्याचा एक भाऊ खांडोळा येथे तर अन्य दोन भाऊ बिहारमधे आपल्या मूळ गावी राहतात. हरींदर हा गवंडीकाम कंत्राटदाराच्या मार्फत करीत होता.
हा खून एकापेक्षा जास्त माणसांनी केला आहे काय, पैशांचा वाद किवा वेश्या व्यवसायामुळे झाला असावा काय यासंबंधी पोलिस अधिक तपास करीत आहेत. पोलिस अधिक्षक पंकज कुमार सिंग तसेच उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क, उदय परब व निरीक्षक मोहन गावडे तपासकाम करीत आहेत. पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेऊन चौकशी चालवली असल्याची माहिती देण्यात आली. हरिदरचा मृतदेह बांबोळी शवागारात पाठवाला असून पोलिस अधिक चौकशी करीत आहेत. पंधरा दिवसानंतर फोंडा पोलिस स्थानकात तिसन्या खुनाची नोंद करण्यात आली असून फोंड्यात पंधरा दिवसांपूर्वी दोन वृद्ध बहिणींचा असाच खून करण्यात आला होता मात्र पोलिसांनी या खुनाचा छडा लावाला होता.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar