अडुळसाचे औषधी गुणधर्म

.

अडुळसा: (अडुसा हिं. अडोसा, अरूशा बांसा गु. अरडुसो, अडुळसो क. अडुसोगे सं. वासक, अटरूष, अमलका इं. मलबार नट ट्री लॅ. ॲघॅटोडा व्हॅसिका, कुल-ॲकँथेसी). ही परिचित व उपयुक्त औषधी वनस्पती भारतात सर्वत्र आढळते श्रीलंका, मलाया, आग्नेय आशिया इ. प्रदेशांतही सापडते.

साधारणतः उष्ण प्रदेशात १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात चांगली वाढते हिमालयाच्या खालच्या भागात सापडते. कोकणात व दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने कुंपणास लावतात. हे लहान क्षुप १.२ – २.४ मी. उंच वाढते. सामान्य शारीरिक लक्षणे  ॲकँथेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट, खाली फिकट व वर गर्द हिरवी फुलोरे फांदीच्या टोकास व फुले (ऑगस्ट ते नोव्हेंबर) पांढरी व हिरव्या छदांनी [→फूल] अंशतः आच्छादलेली फळ (बोंड) लांबट व टोकदार असते.

अडुळशाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे ही सर्व औषधांत विविध रोगांवर वापरतात. पाने खतासाठी व खोडाचा कोळसा बंदुकीच्या दारूसाठी उपयुक्त असतो. पानांत वासिसाईन हे अल्कलॉइड व ॲधॅटोडिक अम्ल असते. कफ, श्वास, कास व रक्तपित्त यांवर अडुळशाचा रस, मध व त्रिकटू (सुंठ, मिरी व पिंपळी) घालून देतात मुळी तादळाच्या धुवणातून उगाळून श्वेत-प्रदरावर (पांढऱ्‍या धुपणीवर) देतात. मुळांचा काढा सैंधव व मधाबरोबर श्वास-कासावर उपयुक्त पानांचा रस अतिसारात व संग्रहणीत गुणकारी असतो. याखेरीज हरप्रकारे इतर शारीरिक विकारांवर ही वनस्पती उपकारक ठरली आहे. आयुर्वेदीय पद्धतीने अडुळशापासून केलेली अनेक औषधे बाजारात आहेत.

अडुळसा, काळा: (रोल, पातेरी हिं. निली निर्गडी क. करिनेक्की गिडं सं. नील निर्गुंडी लॅ.जस्टीशिया जेंडारूस्सा कुल – ॲकँथेसी). हे लहान क्षुप ०·६ – १·२ मी. उंच असून मूळचे चीनमधले, परंतु आता भारतात बागेतून शोभेकरिता वाफ्याभोवती लावतात सावलीत चांगले वाढते. याचा वास उग्र व पाने साधी, लांबट खोड, फांद्या व देठ ही गर्द पिंगट असतात. फुले लहान, फिकट व शोभेच्या दृष्टीने फार गौण. सामान्य शारीरिक लक्षणे ॲकँथेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे नवीन लागवड कलमांनी त्वरित होते. पाने कडू व उष्ण असून कावीळ व हगवण यांवर देतात. जुनाट संधिवातावर पाने व कोवळ्या पाल्याचा काढा गुणकारी आहे. ही वनस्पती ज्वरनाशी व वांतिकारक (ओकारी करणारी) आहे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar