*उपजिल्हाधिकारी श्री. दीपक वायंगणकर यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे शिस्टमंडळ*

.

*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*

दिनांक : २/११/२०२१

_*हिंदु जनजागृती समितीची केंद्रशासनाकडे मागणी*_
*‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !*

डिचोली, २ नोव्हेंबर केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे. मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, तसेच मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना ‘हलाल प्रमाणित’ पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव करणार्‍या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर भारतात बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रशासनाकडे केली आहे. हिंदु जनजागृती समितीने केंद्रशासनाला द्यायचे हे निवेदन २ नोव्हेंबर या दिवशी डिचोली येथील उपजिल्हाधिकारी श्री. दीपक वायंगणकर यांना सुपुर्द केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री रामा गावकर, अरुण हळदणकर, वसंत परब आणि गोविंद चोडणकर यांचा समावेश होता.
हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात म्हटले आहे की, सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी उत्पादनेही हलाल नामांकित असावीत, अशी मागणी मुसलमान करत आहेत. त्यासाठी व्यापार्‍यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी २१ सहस्र ५०० रुपये भरून ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या मुसलमान संघटनेकडून दिले जाते. या हलाल अर्थव्यवस्थेने विश्‍वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे २ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे. हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. या अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य मुसलमानांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे. याअनुषंगाने समितीने पुढील मागण्या केल्या आहेत. ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्या सर्व आस्थापनांची अशी अनुमती त्वरित रहित करावी. शासनाच्या रेल्वे, एअर इंडिया या सरकारी आस्थापनांमध्ये ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच पुरवले जातात, ही व्यवस्था त्वरित बंद करावी आणि ज्या संस्था ‘हलाल सर्टिफिकेशन’ देतात, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का, याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना, याची सखोल चौकशी करण्यात यावी.

*आपला विश्‍वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक*
हिंदु जनजागृती समितीकरीता, संपर्क : ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar