कोवीड नियंत्रणात पण रेव्ह पार्ट्या आणि अंमली पदार्थ अनियंत्रणात

.

म्हापसा  दि. 2  ( प्रतिनिधी  )

       गोव्यातील पर्यटन हंगामाला जोरात सुरवात झाल्याची लक्षणे म्हणजे सुरू झालेल्या रेव्ह पार्ट्या आणी अंमली पदार्थाची उपलब्धता. करोना महामारी मुळे गेल्या वर्षी पर्यटन हंगाम झालाच नाही , पर्यायाने किनारी भागातील सर्व व्यवसाय ठप्प पडले.
     पण या वर्षी कोवीड नियंत्रणात आल्याने शासनाने कोवीड नियमात शिथिलता दिली, याचाच फायदा घेत कोवीड काळात घराबाहेर न पडलेले भारतीय पर्यटकांनी गोव्यात धाव घेण्यास सुरवात केली, पर्यटक येत असल्याचे दिसल्याने किनाऱ्यावरील काही हॉटेल्स व शॅक्स व्यवसायिकांनी घाईघाईत आपले व्यवसाय सुरू करून पर्यटकांसाठी सज्ज ठेवले, तर काही जणांनी पर्यटकांना आवडणाऱ्या संगीत रजन्यांचे अर्थात रेव्ह पार्ट्याचे आयोजन करण्यास सुरवात केली. आरपोरा हिलवर व वागातोर हिलटॉप वर वाजणाऱ्या कर्णकर्कश संगीताचा त्रास होत असल्याचे तेथील स्थानिक सांगतात.
         पर्यटक म्हटले की अंमली पदार्थ आलाच, यंदा अंमली पदार्थही मोठया प्रमाणात गोव्यात आल्याचे सांगितले जाते आणी पोलिसांकडून होणाऱ्या कारवायावरून तसे सिद्ध ही झाले आहे. अद्याप विदेशी पर्यटकांची चार्टर विमाने सुरू झालेली नाहीत तरी सुद्धा देशी पर्यटकांचा ओघ गोव्याकडे वाढल्याने किनारे फुलून गेले आहेत. पर्यटक मोठया प्रमाणात आल्याने काही शॅक्स व्यवसायिकांनी रेव्ह पार्टी आयोजनाचा सपाटा लावला आहे, पर्यटकांना या रेव्ह पार्ट्याची माहिती व्हावी म्हणून जागोजागी नाक्यानाक्यावर पोस्टर – बॅनर्स लावले जात आहेत, यावर कहर म्हणून गेल्याच आठवड्यात सनबर्न संगीत महोत्सव वागातोर येथे करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर करून समर्थक व विरोधकांत वादाची ठिणगी उडवून दिली आहे.
   फोटो………. रेव्ह पार्ट्या आयोजकांनी पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता जागोजागी लावलेले बॅनर्स अर्थात जाहिरात फलक………. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar