पाणी नाही तर मतदान नाही, नियमित पाणी पुरवठ्यासाठी महिलांनी काढला घागर मोर्चा

.

म्हापसा दि.2  ( प्रतिनिधी )

     “पाणी नाही तर मतदान नाही” “आमका जाय आमका जाय नियमित पाणी आमका जाय ” अश्या घोषणा देत बादे वासियांनी परिसर दणाणून सोडला, पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ कायसूव बादे व आसगाव बादे येथील महिलांनी परिसरात घागर मोर्चा काढून नियमित पाणी पुरवठ्याची मागणी केली.सुमारे शंभर हून अधीक महिला व पुरुष जमा झाले होते.
          गेल्या साडेचार वर्षांपासून दरदिवसाआड रात्रीच्या वेळी अपुरा पाणीपुरवठा होत होता तो आता अनियमित झाला आहे. पाणी पुरवठा रात्रीचा करतात मग बिले सकाळी का घेतली जातात असा प्रश्न सविता फडते या महिलेने या वेळी व्यक्त केला, आम्हाला पाणीपुरवठा सकाळच्याच वेळी करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
         पाण्याचे पैसे घेतले जातात मग पाणी का दिले जात नाही ? सरकार मोफत पाणी म्हणते पण पाणी पुरवठाच होत नाही तर मोफत पाण्याच्या वलग्ना कशाला असा सवाल पार्वती नागवेकर यांनी केला.जर दिवाळी पुर्वी सकाळच्या वेळी पुरेसा पाणी पुरवठा झाला नाही तर म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
       सरकार नागरिकांना पाणी, वीज व चांगले रस्ते देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप गीतेश सारंग यांनी केला.येथील जलवाहिन्या चाळीस वर्षा पुर्वी घातलेल्या असून त्या त्वरित बदलण्याची गरज आहे असे सारंग यांनी सांगितले. सणासुदीच्या वेळेस सरकार पाणी पुरवठा करीत नसेल तर काय उपयोग, पाण्यासाठी नागरिकांना गणपती, दिवाळीला दाही दिशा फिरावे लागत असल्याचे निलेश चोडणकर यांनी सांगितले.
         अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे येथील लोकांना गणपतीला टँकरवर अवलंबून रहावे लागले, पाणी पुरवठा खात्याकडे लेखी निवेदन देऊनही काहीच उपयोग न झाल्याने नागरिकांनी या वेळेला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे, या विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या वेगवेगळ्या करण्याची गरज आहे असे येथील पंच सदस्य श्रीसागर नाईक यांनी सांगितले.
      फोटो……… आसगाव बादे येथे नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ येथील महिलांनी काढलेला  घागर मोर्चा………

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar