केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी नव्हे, तर ख्रिस्ती नववर्षासह अन्य सर्व कार्यक्रमांत फटाक्यांवर बंदी असावी !* – हिंदु जनजागृती समिती

.

*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !*

दिनांक : 02.11.2021

*केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी नव्हे, तर ख्रिस्ती नववर्षासह अन्य सर्व कार्यक्रमांत फटाक्यांवर बंदी असावी !* – हिंदु जनजागृती समिती

_*देश आर्थिक संकटात असतांना अब्जावधी रुपयांचे फटाके वाजवण्यापेक्षा ते पैसे कुटुंबासाठी वापरा !*_

फटाक्यांवरील बंदी ही केवळ हिंदूंच्या दिवाळी आदी सणांच्या वेळी नसावी, तर क्रिकेट सामन्यांतील विजय, ‘आयपीएल्’ सामन्यांचा प्रारंभ, चित्रपट तारकांचे कार्यक्रम, तसेच ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्‍या सर्व प्रकारच्या आतीषबाजी यांच्यावरही असायला हवी. शासनकर्त्यांनी वा न्यायालयांनी फटाक्यांवर बंदी घालतांना जाती-धर्मानुसार भेद करणे सर्वथा अयोग्य आहे. सध्या देशाच्या सीमेवर युद्धाचा तणाव आहे. देश आर्थिक संकटात असून महागाईही वाढलेली आहे. अशा वेळी हिंदु समाजानेही दिवाळीत फटाक्यांवर प्रतिवर्षी अब्जावधी रुपये खर्च करण्यापेक्षा ते पैसे सणावारास कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

हिंदु जनजागृती समिती गेल्या 19 वर्षांपासून फटाक्यांद्वारे होणारे प्रदूषण आणि देवतांच्या चित्रांची विटंबना थांबवण्यासाठी संपूर्ण देशभर अभियान राबवत आहे. याअंतर्गत हस्तपत्रकांचे वितरण, प्रशासनाला निवेदन देणे, सामाजिक माध्यमांतून जागृती करणे, जनप्रबोधनासाठी ऑनलाईन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. यात देशभरातील अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी होत असतात. फटाक्यांच्या वेष्टनांवर श्रीलक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णु आदी देवता, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अन्य राष्ट्रपुरुष वा श्रद्धास्थाने यांची चित्रे छापल्याने त्यांच्या चित्रांची मोठ्या प्रमाणावर विटंबना होते. दिवाळीत ज्या श्री लक्ष्मीमातेची आपण पूजा करतो, तिचेच चित्र असलेला ‘लक्ष्मी बाँब’ फोडून चित्राच्या चिंधड्या होऊ देणे, हा श्री लक्ष्मीदेवीचा घोर अवमानच आहे. अशाने श्री लक्ष्मीदेवीची कृपा कधी तरी आपल्यावर होईल का ?, याचा हिंदूंनी विचार करावा. याशिवाय सध्या भारतीय बाजारात चिनी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. चीन भारतात कमावलेला पैसा सीमेवर भारताच्या विरोधात वापरत आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्राला साहाय्य होईल, अशी कोणतीही कृती देशवासियांनी टाळायला हवी.

आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्र्र : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar