श्री महेश्वर देवस्थान कैलासानगर अस्नोडा कार्यक्रमाचे आयोजन!
बातमी: सम्राट क्लब अस्नोडाचा अधिकारग्रहण सोहळा दिनांक 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता श्री. महेश्वर देवस्थान कैलासनगर अस्नोडाच्या सभागृहात उत्साहात पार पडला!
ह्या सोहळ्याला देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुमेध देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सम्राट क्लब इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष सम्राट प्रसाद नाईक व 2021-22 चे गट-अध्यक्ष श्री. विनोद मळीक उपस्थित होते!
तसेच सम्राट क्लब अस्नोडाचे सदस्य सम्राट सम्राट मकरंद वायंगणकर, सम्राट सिद्धेश प्रभूगावकर , सम्राट सचिन बांदोडकर व सम्राट लवू साळगावकर ह्यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सम्राट नंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली
सम्राट क्लब अस्नोडाचे मावळते अध्यक्ष सम्राट महेश अस्नोडकर ह्यांनी स्वागतपर भाषण केले तर नूतन सचिव सम्राट चिन्मय किनळेकर ह्यांनी 2020-21 सालचे अहवाल वाचन केले.
कार्यक्रम पुढे नेताना व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले तर गट-अध्यक्ष सम्राट विनोद मळीक ह्यांनी 2021-22 ह्या वर्षी क्लब मध्ये नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांना शपथबद्ध केले!
मावळते अध्यक्ष सम्राट महेश अस्नोडकर ह्यांनी आपल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना आठवण भेट म्हणून भेटवस्तू प्रदान केल्या! तसेच नूतन अध्यक्ष सम्राट महादेव मालवणकर ह्यांनी उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राट प्रेमानंद मापारी ह्यांनी केले तर सचिव सम्राट चिन्मय किनळेकर ह्यांनी आभार मानले!