बिहार राज्यातून फरार झालेला गुन्हेगार म्हापसा पोलिसांना सापडला

.
बिहार राज्यातून फरार झालेला गुन्हेगार म्हापसा पोलिसांना सापडला, म्हापसा पोलिसांनी बिहार पोलिसांना कळवले असून ते त्या गुन्हेगारास नेण्याकरिता निघाले असल्याचे म्हापसा पोलिसांनी सांगितले.
           म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक किरण नाईक, हवालदार शिवाजी शेटकर, पोलीस शिपाई उल्हास मोरजकर, लिसबार्ट गावस, विष्णू हळदणकर हे गस्तीवर असताना म्हापसा बाजारपेठ परिसरात ऍक्सिस बँकेजवळ शंकरकुमार राजदेव विश्वकर्मा (29) रा. औरंगाबाद, बिहार हा संशयास्पद रित्या फिरताना आढळला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो कोणतेही स्पष्टीकरण देऊ शकत नसल्याने त्याच्या विरुद्ध भादस 41 कलमाखाली गुन्हा नोंद करून अटक केली.
          अधीक चौकशी करताना तो बिहार राज्यातून फरार झालेला गुन्हेगार असल्याचे समजले, त्याच्या विरोधात बिहार पोलीस स्थानकात भादस 458,  323,307,363,365,201 कलमाखाली गुन्हा नोंद असल्याचे समजले. म्हापसा पोलिसांनी बिहार पोलिसांना कळवल्यानंतर बिहार पोलीस शंकरकुमार याला नेण्यासाठी निघाले आहेत. पुढील तपास निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
      फोटो…… बिहार राज्यातून फरार झालेल्या व म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगारासोबत म्हापसा पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक व इतर सहकारी………. (रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar