गिरी म्हापसा येथे कदंब बसने स्कुटरला धडक दिल्याने तरूण जागीच ठार

.

गिरी म्हापसा येथे कदंब बसने डीओ स्कुटरला धडक दिल्याने एक जागीच ठार
म्हापसा दि ०५(वार्ताहर ):-म्हापसा बस्थानकावरून पणजीकडे जाणाऱ्या कदंब बसने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या डीओ स्कुटर जोरदार धडक दिली यात गिरी म्हापसा येथील फ्याईड फ्रँसीस्को आल्मेदा ३८ वर्षे याला स्कुटर सहीत फरफटत ओढत नेल्याने तॊ गंभीर जखमी झाला.वरून जाणाऱ्या व जागीच ठार झाला.ही घटना आज शुक्रवारी सकाळी १०.१५ वा. च्या दरम्यान गिरी येथील ग्रीनपार्क हॉटेल जवळील रस्त्याकडे झाला.
म्हापसा पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार जी.ए.०३ × ०३८२ ही कदंब बस म्हापसा कदंब बसस्थणकवरून पणजीकडे जात होती. त्यावेळी त्याच दिशेने मयत फ्याईड फ्रँसीस्को आल्मेदा हा आपल्या जीए ०३एए एस०६०७या डीओ स्कुटरवरून जात होता. यावेळी कदंब बसने स्कुटरला जोरदार धडक दिली त्यावर आल्मेदा बसखाली पडला. बसने त्याला बरेच लांब फरफटत ओढत नेले यावेळी तॊ गंभीर जखमी झाला.
त्याला म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस हवालदार यांनी अपघाताचा पंचनामा केला व उपचारसाठी पेडे म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी तॊ मृत पावल्याचे जाहीर केले. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी कदंब बस चालक महेंद्र मनोहर गांवकर ४० वर्षे मये येथील चालकाला चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महीला उपनिरीक्षक विभा वळवईकर करीत आहे.
फोटो :-गिरी म्हापसा येथे कदंब बसखाली चिरडलेली स्कुटर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar