गोवा मुक्तीच्या 60व्या वर्षी गोव्यातील 60 वर्षावरील व्यक्तींना गोव्यातील प्रसिद्ध देवालये व संस्कृती चे दर्शन कदंबा बस सेवे

.

म्हापसा  दि. 6  ( प्रतिनिधी )

       येत्या 1 डिसें. ते 19 डिसें. पर्यत गोव्यातील जेष्ठ नागरिकांना गोव्यातील देवदर्शन मोफत करण्याकरिता समजकल्याण खात्यातर्फे योजना राबवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथे दिली.
         म्हापसा येथील घाटेश्वर देवस्थानाच्या समोर बांधण्यात आलेल्या घाटेश्वर सभागृहाचे उदघाट्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, स्थानिक नगरसेवक विराज फडके उपस्थित होते. यावेळी येथील वाहनतळ व मोफत वायफाय सेवेचेही उदघाट्न करण्यात आले.
      गोवा मुक्तीच्या 60व्या वर्षी गोव्यातील 60 वर्षावरील व्यक्तींना गोव्यातील प्रसिद्ध देवालये व संस्कृती चे दर्शन कदंबा बस सेवे द्वारे एकादिवसात घडवून आणण्याची योजना आहे. पणजी व साखळी नंतर म्हापसा स्मार्ट सिटी करण्याकरिता म्हापसा शहराचा विकास आराखडा निवडणुक आचारसंहिता लागू होण्या पुर्वी तयार करण्यात येईल.सरकारच्या अनेक योजना कार्यरत आहेत या योजना जनतेपर्यत पोहचणायाकरिता सर्व लोकप्रतिनिधिनी प्रयत्न करावे असे आवाहन करून या देवस्थानच्या सभोवतालचा परिसर सुशोभीत करण्यासाठी देवस्थान समितीने गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडे प्रस्ताव सादर करावा असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
       देवस्थान समितीने बऱ्याच मेहनतीने सभागृह साकारले, अध्यक्षांनी आपले स्वप्न पूर्ण केले, नगराध्यक्ष म्हणून देवस्थान समितीला आपले संपूर्ण सहकार्य मिळेल असे नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी यावेळी सांगितले.
        देवस्थान सभागृह बांधकामस हातभार लावणारे अभियंता नितिन आरोलकर, बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर, खोर्लीचे नगरसेवक अन्वी कोरगावकर, साईनाथ राऊळ, दाते शिवशंकर मयेकर, तुळशीदास शेट्ये, समीर हरमलकर आदींचा मुख्यमंत्री व नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरवातीला देवस्थानचे अध्यक्ष देश किनळेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
      फोटो……. घाटेश्वर देवस्थान सभागृहाचे उदघाट्न करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सोबत नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, नगरसेवक विराज फडके, देवस्थानचे अध्यक्ष देश किनळेकर व इतर मान्यवर…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar