मुणांगवाडा, आसगाव बार्देश येथील श्री बारासाखळेश्वर देवस्थान समितीतर्फे कार्तिक एकादशीनिमित्त रविवार दि.14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुसरी अखिल गोवा महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अर्ज केल्यानंतर काही निवडक पथकांनाच प्रवेश दिला जाईल एका पथकात कमीत कमी पाच व जास्तीत जास्त बारा स्पर्धक असावेत.
विजेत्यांना प्रथम रु.5555/-, दुसरे रु.4444/-, तिसरे रु.3333/- व तीन उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.1111/- अशी बक्षिसे देण्यात येतील. शिवाय उत्कृष्ट अभंग गायिका, उत्कृष्ट गवळण गायिका, हार्मोनियमवादक, पखवाज/तबलावादक ( फक्त महिला )यांच्यासाठी प्रत्येक गटात अनुक्रमे रु.1000/-, रु.700/-, व रु.500/- अशी बक्षिसे दिली जातील.स्पर्धेतील सहभागाकरिता इच्छुक स्पर्धक गटांनी गोपाळ सावंत 9604203406, हेमंत रेडकर 9850477115, किंवा अनिल सावंत 7507391661 यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी कळवले आहे.