म्हापसा दि. 7 ( प्रतिनिधी )
बागा हडफडे येथे एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करीत हणजूण पोलिसांनी यात गुंतलेल्या चार पीडित युवतींची सुटका केली तर प्रवीण निवृत्ती बोराटे (31) मूळ घाटकोपर, मुंबई सध्या रा. बागा, कळंगुट या दलालास अटक केली.
हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हडफडे बागा येथील बागा स्पाईस हिल्स या हॉटेलात वेश्याव्यवसाय चालत असल्याची खबर मिळाल्यानंतर हणजूण पोलीस निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सावळ यांनी हवालदार श्याम पार्सेकर, पोलीस शिपाई विद्यानंद दिवकर, महिला पोलीस प्रतिज्ञा नाईक, पूजा नाईक यांना सोबत घेऊन दि.7 रोजी पहाटे 1 च्या दरम्यान त्या हॉटेलात धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील चार युवती व प्रवीण बोराटे हा दलाल उपस्थित होता. पोलिसांनी चारही युवतीची सुटका करून त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात केली तर दलाल प्रवीण बोराटे याचे विरोधात भादस 370(A)(2) आणी वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायदा कलम 3,4 आणी 5 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. त्याला न्यायालयाय हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पुढील तपास निरीक्षक सुरज गावस हे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक व विभागीय उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
फोटो ……. वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या संशयीतासह हणजूण पोलीस निरीक्षक सुरज गावस सोबत उपनिरीक्षक अमीर तरल, उपनिरीक्षक स्नेहा सावळ व इतर पोलीस सहकारी……… ( रमेश नाईक )