कांदोळी येथील श्री शांतादुर्गा सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटनेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार

.
म्हापसा  दि.7  ( प्रतिनिधी )
कांदोळी येथील श्री शांतादुर्गा सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटनेतर्फे लवकरच विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. यासंदर्भात कांदोळीतील विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची छायामुद्रित प्रत छायाचित्र व पंचायतीने दिलेला निवासी दाखला यांसह २० नोव्हेंबरपर्यत संघटनेच्या सचिव शुभांगी वायंगणकर (इस्क्रिवावाडा-कांदोळी, मोबाइल : ७७९८६८३४८५) यांच्याशी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहावी परीक्षेत किमान ७५ टक्के गुण मिळवणारे कांदोळीतील विद्यार्थी तसेच हिंदी, कोकणी, विज्ञान व गणित या विषयांत सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. तसेच बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक अशा विद्याशाखांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा तसेच बारावी परीक्षेत कळंगूट विधानसभा मतदारसंघात वाणिज्य शाखेत प्रथम येणाऱ्याचाही सत्कार केला जाणार आहे. त्याशिवाय, इयत्ता चौथी व सातवीमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जातील.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar