मांद्रे गट काँग्रेस समितीच्या सेवादल,युवा समिती व अन्य समित्यावरील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली

.

मांद्रे गट काँग्रेस समितीच्या सेवादल,युवा समिती व अन्य समित्यावरील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे नुकतीच देण्यात आली.ह्या सोहळ्यास राज्य युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर,मांद्रेचें नेते सचिन परब व अन्य उपस्थित होते.

या बैठकीत मार्गदर्शन करताना राज्य अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी काँग्रेसच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही व जनतेला महागाईच्या वणव्यात लोटले असल्याने जनतेला परिवर्तन पाहिजे व त्यासाठी आगामी अल्प काळात प्रत्येक कार्यकर्ता,पदाधिकारी व नेत्यानी जनतेच्या संपर्कात राहून काँगेसचे कार्य विस्तारले पाहिजे,असे राज्य अध्यक्ष म्हार्दोळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.गट समितीचे पदाधिकारी हे मतदाराच्या  साहाय्याने पक्षाचे कार्य बळकट करण्यासाठी राबळे पाहिजे.पक्षाची ध्येयधोरणे, कार्यक्रम व योजनांची माहिती तळागाळात दिली पाहिजे,असे गोवा युवा राज्य अध्यक्ष म्हार्दोळकर यांनी सांगितले.

गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्य व इतिहास जनतेसमोर असून कोविड काळात ढिसाळ नियोजन तसेच महागाईचा भस्मासुर भाजपने चालविला असून नोकर भरतीतला भ्रष्टाचार आदी विषय घेऊन मांद्रे काँग्रेसने जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे. युवाच्या उद्धारासाठी काँग्रेस पक्ष सक्रिय असून नेहमीच त्यांच्या मताचा आदर करून कार्य चालविले आहे.युवा देशाच्या जडणघडणीत महत्वाचे स्थान असून त्यांच्या हाकेला नक्कीच प्रतिसाद देऊ.आगामी निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा आमदार विधानसभेत पाठविण्याचा निर्णय मतदारांनी निश्चित केल्याचे युवा नेते सचीन परब यांनी व्यक्त केले.

मांद्रे मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत असून कार्यकर्त्यानी निरपेक्षपणे कार्य चालू ठेवले पाहिजे.कोविड काळात काँग्रेस पक्षाने विशेषतः उद्योजक सचिन परब यांचे कार्याची दखल प्रदेश समितीने घ्यावी व युवा मतदाराच्या पाठीशी असलेल्या युवकांना दिलासा दयावा,असे युवा पदाधिकारी सूरज रेडकर यांनी सांगितले.यावेळी सेवा दल अध्यक्ष अरुण वस्त,प्रणव परब,राज्य युवा सरचिटणीस साईश आरोस्कर,उत्तर गोवा युवा सरचिटणीस अनुष्का धावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो
हरमल—मांद्रे गट काँग्रेस समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात राज्य अध्यक्ष वरद म्हार्दोळकर,युवा नेते सचिन परब,अरुण वस्त, प्रणव परब,अनुष्का धावरे ,सूरज रेडकर,राजू गावडे,पांडुरंग पार्सेकर व अन्य

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar