‘पं. वामनराव पिळगावकर शिष्य आणि हितचिंतक परिवार’ या संस्थेच्या अध्यक्षपदी नामवंत गोमंतकीय भजन कलाकार गणेश पार्सेकर यांची निवड

.
म्हापसा  दि.  9 ( प्रतिनिधी )
‘पं. वामनराव पिळगावकर शिष्य आणि हितचिंतक परिवार’ या संस्थेच्या अध्यक्षपदी नामवंत गोमंतकीय भजन कलाकार गणेश पार्सेकर यांची निवड करण्यात आली आहे. बार्देश तालुक्यातील पर्रा येथील श्री लिंगभाट देवस्थानच्या आवारात संस्थेचे अध्यक्ष महाबळेश्वर च्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेची ही नवीन कार्यकारिणी आगामी दोन वर्षांसाठी निवडण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे: उपाध्यक्ष : पांडुरंग राऊळ, सचिव : सुरेश केरकर, खजिनदार : प्रकाश काकतकर, सल्लागार : गोरख मांद्रेकर व महाबळेश्वर च्यारी, कार्यकारिणी सदस्य : शेखर नागडे, एकनाथ गोवेकर, नीलेश गोवेकर, वसुधा मांद्रेकर, वासुदेव मांद्रेकर, प्रकाश नाईक, प्रेमनाथ पाळणी, लवू तिरोडकर, वासुदेव परब, सूर्याजी नाईक, सुदेश आर्लेकर, संदीप कामूलकर, प्रकाश धुमाळ, चंद्रकांत सातोस्कर. या सभेवेळी गोरख मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर पांडुरंग राऊळ यांनी आभारप्रकटन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar