शिवोलीत मेहनती आमदार देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे : मंत्री मायकल लोबो.

.

 

शिवोलीत मेहनती आमदार देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे : मंत्री मायकल लोबो.
म्हापसा दि ०९(प्रतिनिधी .):-बार्देश तालुक्यातील शिवोली मतदार संघात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या उग्र रुप धारण करून जनतेसमोर आहे. येथील जनतेच्या समस्यांवरुन चोवीस तास आग्रहाने  झटणाऱ्या मेहनती आमदाराची शिवोलीला आज खरी गरज आहे. दुर्दैवाने शिवोलीत ही गोष्ट दिसत नाही त्यामुळे मतदारांनी विद्यमान आमदाराच्या घरी जाणेच बंद केले आहे त्यामुळेच शिवोलीला येत्या विधानसभा निवडणुकीत  मेहनती आमदार देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन  कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी काणकात सांगितले.
म्हापसा नजीकच्या काणका वेर्ला येथील मुख्य रसत्याचे मिल्टन मार्कीस असे नामकरण केल्यानंणर मंत्री लोबो बोलत होते. दरम्यान, राज्य सरकार  प्रत्येक आमदाराला भरमसाठ पगार दिला जातो तो पैसा जनतेच्या करातून येत असतो त्यामुळे जनतेचा पैसा  खाऊन कुठलाही आमदार लोकांना घरची दारे बंद करु शकत नाही परंतु शेजारच्या मतदार संघात असा प्रकार दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी पुढे बोलतांना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर काणका-वेर्लाच्या सरपंच अमिता कोरगांवकर, उप-सरपंच व्रुक्षाली आर्लेकर, पंच सदस्य तसेच स्व. मिल्टन यांच्या कन्या  निकॉला लोबो, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष वासुदेव कोरगांवकर,  पर्राच्या सरपंच दिलायला लोबो, आंसगांवचे सरपंच हनुमंत नाईक, कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, म्हापसाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. म्हापशाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी पर्रा तसेच काणका- वेर्ला सर्कलच्या धर्तीवर सुशोभीकरणाचे काम म्हापशातील आपल्या प्रभागापर्यत नेण्याचे मंत्री लोबो यांना आवाहन केले. यावेळी निव्रुत्त शिक्षीका सिसिलिया रॉड्रीगीश, फ्रांन्सिस्को आग्नेलो लोबो, डॉ. श्रुतीका पाटकर, यांचा त्यांच्या योगदानाबद्दल मंत्री मायकल लोबो जाहीर सत्कार करण्यात आला.
मिल्टन मार्कीस हे आज जरी आपल्यात नसलें तरी येथील सर्कलच्या रुपाने ते सदोदित याभागातील लोकांच्या लक्षात राहणार असल्याचे आंसगांवचे सरपंच हनुमंत नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी लक्ष्मीकांत बिचोलकर, सागर लिंगुडकर यांचीही समयोचित भाषणे झाली.  सुत्रसंचालन उमाकांत कोरगांवकर यांनी तर आभार प्रदर्शन पंच सदस्य निकॉला मार्टीन्स यांनी केले.

फोटो : काणका सर्कलचे मिल्टन मार्कीस नामकरण फलकाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री मायकल लोबो, सोबत सरपंच अमिता कोरगांवकर, दिलायला लोबो व इतर मान्यवर.( छाया: प्रणव धुमाळ )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar