गिरी सरपंचपदी रीमा गडेकर यांची निवड

.

गिरी सरपंचपदी रीमा गडेकर यांची निवड
म्हापसा दि १०(प्रतिनिधी ):-गिरी ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या सरपंचपदाची निवड आज मंगळवारी सकाळी १० वा पंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी पुन्हा रीमा गडेकर यांची निवड करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपूर्वी चैताली मोरजकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यावर रीमा गडेकर यांची सरपंच म्हणून निवड झाली. त्यानंतर तिचा कालावधी संपल्यावर परत चैताली मोरजकर यांना सरपंच म्हणून निवड करण्याचे ठरले पण त्यांना कुणी पाठींबा दिला नसल्याचे समजले. त्यांवर रीमा नाईक यांच्याकडे पुन्हा सरपंच पद देण्यात आले. व त्यानंतर कालांतराने तिने राजीनामा दिला. व दोन पंच सदस्यपॉसिटीव्ह झाल्याने उपसरपंच बाबाजी गडेकर यांच्याकडे ताबा देण्यात आला.
आज सरपंच पदाची निवडीवेळी पंच सनी ननोस्कर, कल्पेश नाईक, निरूपा साळगावकर, बाबाजी गडेकर, फोडूं नाईक, गब्रियल फर्नांडिस उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी म्हणून शिरीषकुमार तारी यांनी काम पाहीले त्यांना सचिव ओर्विल रॉलीस यांनी सहकार्य केले.
फोटो :-सरपंच रीमा गडेकर यांचे स्वागत करताना आमदार जयेश साळगावकर व इतर (छाया :-प्रणव धुमाळ )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar