पर्रा येथे १९ रोजी फुटबॉल स्पर्धा
म्हापसा दि १०(प्रतिनिधी )-: पर्रा येथे जागृती क्रीडा आणि सांस्कृतिक संघातर्फे येत्या १९ नोव्हेंबर रोजी पहिल्या अखिल गोवा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सेंट अॅनी चर्च मैदानावर खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघास ३५ हजार रोख व आकर्षित चषक, उपविजेत्या संघास २५ हजार रोख व आकर्षित चषक, उपांत्य फेरीत पराभूत संघास प्रत्येकी ५ हजार रोख व चषक, उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट गोलरक्षकाल प्रत्येकी १ हजार रोख व चषक अशी बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत प्रवेश शुल्क अडीच हजार रुपये असून येत्या १३ रोजी पर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील. स्पर्धेचे बक्षीस वितरण मंत्री मायकल लोबो व आमदार विनोद पालयेकर यांच्या हस्ते होईल.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष कृष्णा कोरगावकर (९३२२३३९२५०), सतीश कोरगावकर (८९७५५७६०४४) व संघ व्यवस्थापक महेश कोरगावकर (८४०८९६५६३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.
पर्रा येथे १९ रोजी फुटबॉल स्पर्धा
.
[ays_slider id=1]