वझरांत वागातोर येथील नैसर्गिक झरीच्या सुशोभीकरणाच्या व संवर्धनाचे काम.

.

म्हापसा  दि. 10   ( प्रतिनिधी )

       एकीकडे पाण्याचे दुर्भीष्य असताना दुसरीकडे नैसर्गिक झऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. लुप्त पावत चाललेल्या झऱ्यांचे संवर्धन व संगोपन होणे गरजेचे असल्यामुळेच येथील दोन झऱ्यांचे संवर्धनाचे काम जलस्रोत खात्यामार्फत हाती घेण्यात आले आहे अशी माहिती माजी मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी दिली.
          वझरांत, वागातोर येथील निसर्गाच्या कुशीत असलेल्या आणी झाडे झुडुपे वाढल्याने अडगळीत पडलेल्या दोन झरिंच्या परिसर सफाईच्या व संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ आमदार पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी येथील शॅक्स व्यवसायिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
        काही वर्षापुर्वी खाऱ्या पाण्याची आंघोळ करण्यासाठी येणारे गोमंतकीय व पर्यटक समुद्र स्नानानंतर निसर्गाच्या कुशीतील या झरीवर आंघोळ करीत असत आता या झरिंचे पुन्हा संवर्धन केल्यास पर्यटकांना तसेच येथील शॅक्स व्यवसायिकांना त्याचा फायदा होईल, पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटेल. लवकरच या किनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी टॉयलेट्स उपलब्ध केली जातील असे आश्वासन आमदार पालयेकर यांनी यावेळी बोलताना दिले.
      फोटो ……. वझरांत वागातोर येथील नैसर्गिक झरीच्या सुशोभीकरणाच्या व संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ करताना आमदार विनोद पालयेकर सोबत इतर…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें