गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती 

.

गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती 
गांडूळ खत दोन पद्धतीने तयार करता येते एक ढीग आणि दुसरी खड्डा पद्धत. दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी लागते.

गांडूळ खत तयार करण्यास खड्डा पद्धत –

१. खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत.

२. खड्ड्याची लांबी तीन मीटर, रुंदी दोन मीटर आणि खोली ६० सेंटिमीटर ठेवावी.

३. खड्ड्याच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस व गव्हाचा कोंडा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.

४. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः १०० किलोग्राम सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी.

५. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त ५० सेंटिमीटर जाडीचा थर रचावा. ६. त्यावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे.

७. गांडुळाच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थ मध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे.

८. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावे. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळ खताचा शंक्वाकृती ढीग करावा.

९. ढीगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळुन घ्यावे.

१०. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.

गांडूळ खत तयार करण्याची ढीग पद्धत –

१. ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणतः २.५ ते ३.० मीटर लांबीचे आणि ९० सेंटिमीटर रुंदीचे ढीग तयार करावेत.

२. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ३. ढीगाच्या तळाशी नारळाच्या काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा थर रचावा त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओला करावा.

४. या थरावर तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.

५. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो.

६. या थरावर पूर्ण वाढलेली गांडूळे अलवारपणे सोडावेत. साधारणतः शंभर किलो ग्रॅम सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी.

७. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष जनावरांचे मलमूत्र धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरिपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा.

८. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. त्यातील कर व नत्राचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची ६० पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये चाळीस ते पन्नास टक्के पाणी असावे.

१०. त्यासाठी ढिगावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे.

११. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० सेल्सियस अंशांच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें