म्हापश्यात १३ रोजी सम्राट क्लबतर्फे मान्यवरांचे सत्कार
म्हापसा दि. १३(प्रतिनिधी ):- रंगभूमी दिनाचे अवंचित्य साधून येत्या शनिवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी 4 वाजता श्रीदोरा काकुलो महाविद्यालयच्या सभागृहात नाट्यकर्मी व तियात्रीस यांचा प्रमुख पाहुणे गोमंतकातील ज्येष्ठ संगीतकार, नाट्यकलाकार पंडीत मोहनदास पोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
सत्कार मूर्तीमधील गोपाळ रायकर (नाट्यकलाकार), रामकृष्ण नागवेकर (नाट्यकलाकार ), प्रमोद नाटेकर (रंगकर्मी ), रमेश हिरोजी (नाट्यकलाकार ), पोसकॉल फर्नांडिस (तियात्रीस ), रेजिनाल्ड डी. शिवोलीम यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
वरील सर्व सत्कार मूर्तिनी आपल्या क्षेत्रामध्ये गोमंतकातील वेगवेगळ्या भागामध्ये कला पेश करून आपली कला लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. त्यानिमित्त रंगभूमीचे औचित्य साधून सम्राट क्लब म्हापसा यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी छोटी एकांकिकाही सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर, सचिव अभय हजारें, प्रकल्प अधिकारी प्रकाश धुमाळ यांनी कळविले आहे.
फोटो :1) गोपाळ रायकर, 2) रामकृष्ण नागवेकर,3) प्रमोद नाटेकर,4) रमेश हिरोजी,5) पोसकॉल फेर्नांडिस,6) रेजिनोल्ड डी. शिवोलीम
म्हापश्यात १३ रोजी सम्राट क्लबतर्फे मान्यवरांचे सत्कार
.
[ays_slider id=1]