शापोरा किल्ला गोवा सरकारच्या पुरातत्व व पुराभिलेख खात्याकडे असूनही दुर्लक्षित

.

म्हापसा दि. 11  ( प्रतिनिधी )

       इतिहासाची आठवण करून देणाऱ्या गोव्यातील किल्ल्यापैकी एक म्हणजे शापोरा किल्ला. हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात असलेला हा शापोरा किल्ला गोवा सरकारच्या पुरातत्व व पुराभिलेख खात्याकडे असूनही दुर्लक्षित झालेला आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या शापोरा किल्ल्याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याची दुर्दशा झाली असून किल्ला पूर्णपणे ढासळत आहे, या किल्ल्याकडे संबंधित खात्याने लक्ष द्यावे अशी इतिहासप्रेमीची, पर्यटकांची व स्थानिकांची मागणी आहे.
       अरबी समुद्रातून ये-जा करणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवता यावे यासाठी शापोरा नदीच्या मुखावर 1717 च्या सुमारास हा किल्ला बांधला गेला. हणजूण गावातील शापोराचे खरे नाव म्हणजे ‘शहापुरा ‘. पोर्तुगीज राजवटीपूर्वी विजापूरचा आदिलशहा याचे गोव्याच्या काही भागावर राज्य होते. त्याच्या नावावरूनच गावाला ‘शहापुरा ‘ नाव पडल्याचे सांगितले जाते. पोर्तुगीजांनी पुठे त्याचा ‘शापोरा ‘असा अपभ्रश केला.किल्यावरून समुद्रात जाण्याकरिता भुयारी मार्ग होता तो ढासळल्याने बंद आहे. या किल्याच्या एका बाजूला गुहेत स्वयंभू श्री सिद्धेश्वराचे देवस्थान आहे तर दुसऱ्या बाजूला मासेमार जेटी आहे. किल्याच्या समुद्राच्या बाजूला डोंगर उतारावरील जागेत एका हॉटेल व्यवसायिकाने अतिक्रमण केल्याची तक्रार स्थानिककडून करण्यात आली होती.
             या किल्ल्याच्या दुरुस्तीकरिता गोव्याच्या अर्थसंकल्पात अनेकदा तरतूद करण्यात आली पण 2017 पर्यत या किल्याच्या दुरुस्ती कडे कोणी लक्ष दिले नाही.या किल्याकडे जाण्याकरिता योग्य रस्ता नव्हता, डोंगर रस्त्याने कसेबसे वर चढून जावे लागत होते त्यामुळे या ठिकाणी तुरळक पर्यटक भेट देत होते. सुरक्षेचा अभाव असल्याने किल्यावर येणाऱ्या पर्यटकांना लुटण्याचे आणी  वाहनातील चोऱ्यांचे प्रकार होत होते. 2017 मध्ये स्थानिक आमदारांच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांनी या ठिकाणी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली आणी पायथ्यापासून किल्यापर्यत पायऱ्यांचे बांधकाम करण्याचे आदेश दिले अखेर 2018-2019 मध्ये पायऱ्यांचे बांधकाम झाल्यानंतर किल्यावर पर्यटकांची वर्दळ वाढली.
            पुरातत्व व पुराभिलेख खात्याने या किल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या पण किल्याची डागडुजी मात्र केली नाही, किल्याचे बुरुज ढासळले असून किल्याच्या दरवाजावर, तटबंदीवर झाडेझुडुपे वाढली आहेत.येथे पर्यटकांकडून टाकला जाणाऱ्या कचऱ्याची स्वच्छता कधीतरी स्वयंसेवी संघटनेकडून केली जाते. पायऱ्यांचे बांधकाम करण्यात आल्याने पर्यटकांची वर्दळ वाढली परिणामी पर्यटकाच्या सोयी साठी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरती दुकाने थाटली,  काही विक्रेते किल्याच्या आतपर्यत पोहचले, विक्रेत्याच्या प्लास्टिकच्या तात्पुरत्या बांधकामामुळे परिसराला ओंगळवाणे स्वरूप आले आहे. या किल्याची डागडुजी करावी व सुशोभीकरण करावे अशी स्थानिकांची व पर्यटकांची मागणी आहे.
         जर सरकारने या किल्ल्याचे सुशोभीकरण केले तर येथे पर्यटकांची वर्दळ वाढेल, पर्यायाने कचरा समस्ये बरोबरच सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होईल या करिता या ठिकाणी सफाई कामगार, खाजगी सुरक्षा आणी पोलीस गस्त ठेवावी लागेल.
  फोटो ……1) शापोरा किल्याच्या बाहेर वाढलेली झाडे झुडुपे  2) तटबंदी व दरवाजावर वाढलेली झाडे 3) किल्याचा अंतर्गत भाग  4) किल्याची ढासळलेली तट बंदी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar