साळगाव येथील कचरा प्रकल्पाची पाहणीकरताना मंत्री मायकल लोबो.

.
म्हापसा  दि. 11  ( प्रतिनिधी )
          साळगांव पठारावरील विस्तारीकरण तसेच सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन गेल्या वर्षभरापासून बांधण्यात येत असलेला कचरा प्रकल्प पुढील महिन्यांत प्रायोगिक तत्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. १०३ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पात प्रतिदिन २५० टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाईल. या नव्या प्रकल्पात ओला व सुक्या कचर्‍यावर वेगळी प्रक्रिया केली जाणार आहे अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
आरंभी तीन महिने प्रायोगिक तत्वावर सुरु केल्यानंतर पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरु केला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर वर्गीकरण न करता पाठवण्यात येणारा कचरा स्विकारला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला. सदर प्रकल्प देशातील इतर राज्यांसाठी आदर्श असा ठरणार आहे.
काकोडा येथील प्रकल्प डिसेंबरात सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे चार तालुक्यांतील तसेच राज्यातील सुमारे ७५ टक्के कचर्‍याची समस्या दूर होण्यास मदत होईलअसेही त्यांनी सांगितले.
         घन कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, कचरा व्यवस्थापन महामंडळाचे संचालक लेविन्सन मार्टिन्स, पायाभूत सुविधा महामंडळाचे सरव्यवस्थापक संदीप प्रभू चोडणेकर तसेच हिंदुस्थान वेस्ट ट्रिटमेंटचे संचालक संकेत धंदेरीया यांनी संयुक्तपणे या विस्तारीत प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी पत्रकारांकडे बोलताना त्यांनी सांगितले की सध्या असलेल्या प्रकल्पातील उणीवा दूर करुन नवा प्रकल्प उभारला आहे. सध्या पणजीसह उत्तर गोव्यातील पंचायतीकडून सुमारे १८० टन कचरा प्रकल्पात येतो. त्यावर दोन किंवा तीन शिफ्टने प्रक्रिया केली जाते.घातक अर्थात धोकादायक कचरा, वैद्यकीय कचरा, बांधकाम कचरा तसेच ई-कचरा या सर्व प्रकारच्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यासाठीचे काम सुरु आहे. त्यातील इ-कचरा वगळता सर्व प्रकारच्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प डिसेंबरपर्यंत सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री लोबो यांनी पंचायतींना कचर्‍याचे वर्गीकरण करण्यासाठी सक्ती केली जाणार असल्याची माहिती दिली. वर्गीकरण न करणार्‍या पंचायतीचा कचरा स्विकारला जाणार नाही. तसेच कचजयाची वाहतूक करताना त्यातील सांडपाणी गळणार नाही किंवा उघड्या वाहनातून वाहतूक करणारा कचरा स्विकारला जाणार ननसल्याचा इशारा दिला.आजही राज्यातील बर्‍याच पंचायती कचर्‍याचे वर्गीकरण करीत नाही. अशा पंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचाही इशारा दिला. कचर्‍याची वाहतूक करण्यासाठी गरीब पंचायतींना वाहन खरेदीसाठी सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील सर्व प्रकारचे प्रकल्प सुरु झाल्यानंतर रस्त्याच्याकडेला टाकण्यात येणारा कचरा दिसणार नाही. त्यामुळे राज्य कचरा मुक्त राज्य होणार असल्याची ग्वाही लोबो यांनी दिली. कचरा प्रश्न पूर्ण क्षमतेने सोडवण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीची आवश्यकता असल्याचे मंत्री लोबो यावेळी म्हणाले.फोटो……साळगाव येथील कचरा प्रकल्पाची पाहणीकरताना मंत्री मायकल लोबो. सोबत लेविन्सन मार्टिन्स, संदीप प्रभू चोडणेकर तसेच संकेत धंदेरीया. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar