कडूलिंबाचे औषधी गुणधर्म

.

कडूलिंब:

कडूलिंबाचे झाड हे सर्वत्र अगदी सहजपणे आढळते. हे झाड कुठेही उगवते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कडुलिंबाला खूप महत्त्व आहे. विविध आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्याचे सामर्थ्य कडुलिंबात आहे. फार प्राचीन काळापासून कडूलिंबाचा उपयोग औषध म्हणून करण्यात येत आहे. कडूलिंबाची पाने, बिया, खोड, साल या सर्व भागांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात.

कडूलिंबाचे औषधी गुणधर्म पाहता अनेक सौंदर्य प्रसाधने व कृमिनाशक उत्पादनांमध्ये कडूलिंबाचा वापर केला जातो. कडूलिंबाची पाने, बिया यांचा उपयोग औषध म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. कडूलिंबामध्ये अॅंटीबॅक्टेरियल, अॅंटीफंगल, अॅंटीव्हायरल अशी अनेक तत्वे आढळतात. तोंडाचा येणारा घाणेरडा वास दूर करण्यासाठी व दात स्वच्छ करण्यासाठी कडूलिंबाच्या पानांच्या काड्या एकत्र करून दात घासल्यास तोंडातला  घाणेरडा वास दूर होतो व पिवळे दात स्वच्छ होतात.

दात व हिरड्या मजबूत होतात. कडुलिंबाला इंग्रजीमध्ये असे म्हटले जाते व कडूलिंबाचे शास्त्रीय नाव असे आहे. भारत देशामध्ये कडुलिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कडूलिंबाचे औषधी गुणधर्म पाहता कडुलिंबाची वृक्ष तोड कमी होऊ लागली आहे. शरीरातील कर्करोगपेशींची संख्या नियंत्रण ठेवण्याचे काम कडूलिंबाचे औषधी घटक करतात.

कडुलिंबाच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व खनिजे यांची मात्रा आढळते, त्यामुळे हाडांना मजबुती देण्याचे काम कडुलिंब करते. कडूलिंबापासून आयुर्वेदिक तेल बनवले जाते. हे तेल सांधेदुखी, गुडघेदुखी यांमध्ये आराम देते. हाडांमधील वेदना दूर करण्यास कडू लिंबापासून बनवलेले तेल मदत करते. कडुलिंब शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे महत्त्वाचे काम करते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar